गडचिरोली- जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

गडचिरोली- सर्व सोयी सुविधायुक्त १०० खाटांच्या जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे आज १५ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. या रूग्णालयातून जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेरील रूग्णांनाही आता दर्जेदार सेवा मिळणार आहे.

गडचिरोली- सर्व सोयी सुविधायुक्त १०० खाटांच्या जिल्हा महिला व बाल रूग्णालयाचे आज १५ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. या रूग्णालयातून जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेरील रूग्णांनाही आता दर्जेदार सेवा मिळणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री ना. दीपक सावंत होते. विशेष अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर, खा. अशोक नेते, आ.डाॅ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ. प्रदिप व्यास, आरोग्य व अभियान संचालक आयुक्त डाॅ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल  आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर रूग्णालयातील प्रत्येक विभागाची मुख्यमंत्री तसेच मान्यवरांनी पाहणी केली. सुसज्ज रूग्णालयाच्या वास्तूमधील प्रत्येक नवनविन उपकरणांची माहिती जाणून घेतली. सिटी, स्कॅन, एक्स - रे, शस्त्रक्रिया कक्ष आदींची पाहणी केली. 

महिला व बाल रूग्णालयात महिलांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन मशिनचेसुध्दा उद्घाटन याप्रसंगी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. प्रमोद खंडाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदिप खवले, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: innaugration of hospital in gadchiroli by chief minister