इनोव्हेशन हेच भविष्य

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : "नॉलेज इज पॉवर' असे म्हटले जाते. मात्र, आज जगातील कोणतीही माहिती एका क्‍लिकवरून क्षणामध्ये आपल्यापुढे सादर केली जाते. गुगलमुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. आज इनोव्हेशनविना कोणत्याही देशाची प्रगतीच शक्‍य नाही. "इनोव्हेशन' हेच भविष्य असून युवांनी त्याच्याकडे लक्ष देऊन काम करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.
"इनोव्हेशन पर्व'च्या निमित्ताने शुक्रवारी (ता. 23) आयोजित गटचर्चेमध्ये ते बोलत होते. "इनोव्हेशन ड्रिव्हन सोसायटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट वे ऍण्ड मिन्स' या विषयावर आयोजित गटचर्चेमध्ये महापौर नंदा जिचकार, भारत सरकार एमएचआरडीचे इनोव्हेशन डायरेक्‍टर डॉ. मोहित गंभीर, केडीके महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख व प्राचार्य डॉ. सी. सी. हांडा, प्लॅनेट-व्ही इंडियाचे संचालक डॉ. विक्रमसिंग पाचलोरे, नागपूर फस्टचे तन्वीर मिर्झा, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख सहभागी झाले होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्वत:च्या शैक्षणिक जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला.
भारत सरकार एमएचआरडीचे इनोव्हेशन डायरेक्‍टर डॉ. मोहित गंभीर यांनी रोजच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे, अडचणींचे उत्तर आपल्या इनोव्हेशनच्या माध्यमातून शोधण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी याच विषयावर झालेल्या गटचर्चेत नीरीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पवन लाभसेटवार, जीआयझेड-एमएसएमईचे कन्सल्टंट डॉ. रवींद्र अहेर, विदर्भ बिझनेस फोरमचे सीईओ आर्की. नीलेश राहाटे, युवा मार्गदर्शक श्रीयश जिचकार, एलऍण्डटी इन्फोटेकच्या कन्सल्टंट नेहा मालीकर, बेंगळुरू येथील श्री. श्रीकांत, विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीचे श्री. दुष्यंत यांनी सहभाग घेतला. दोन्ही गटचर्चेचे समन्वयन मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com