मोबाईल पाण्यात पडला अन् ‘लोकल टू ग्लोबल’ संशोधनाची भरारी; अजय विश्वकर्माचे नावीन्यपूर्ण संशोधन

Innovative research by Ajay Vishwakarma from Yavatmal
Innovative research by Ajay Vishwakarma from Yavatmal

पुसद (जि. यवतमाळ) : उपयोजीत तंत्रज्ञानचा उपयोग करून संशोधनातून पुसद येथील अजय विश्वकर्मा या युवा तंत्रज्ञाने तयार केलेल्या ‘मल्टीपर्पज वाटर रजिस्टंट सोलुशन’ या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या वर्गातील हे भारतातील पहिले उत्पादन आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारतासाठी ग्रामीण भागातील अजय यांचा हा ‘लोकल टू ग्लोबल’ संशोधन प्रकल्प उल्लेखनीय ठरला आहे.

पुसद येथील मोबाईल तंत्रज्ञानातील व्यवसायिक अजय विश्वकर्मा यांनी जिज्ञासू वृत्तीने काही नावीन्यपूर्ण संशोधन केले. एकदा त्यांचा मोबाईल पाण्यात पडला. पाण्यामुळे तो खराब झाला व त्यांची संशोधक वृत्ती जागी झाली. हा प्रसंग संशोधनासाठी त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. बऱ्याच प्रयत्नातून त्यांनी जल प्रतिरोधक लिक्विड तयार केले. त्याचा वापर करून मोबाईलचा मदरबोर्ड जल प्रतिरोधक बनविला. पुढे त्यांनी हे संशोधन सुरू ठेवले.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व घरगुती वॉटर कुलर सारखी साधने जल प्रतिरोधक बनविण्यासाठी संशोधित लिक्विड त्यांनी तयार केले. त्यांनी जवळपास आठ वर्षांची पेटंट मिळविण्यासाठी लढाई लढली. त्यात यश मिळवीत प्रकल्पाचे पेटंट मंजूर झाले.

पुढे ‘प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट’ हा प्रवास पूर्ण करीत साई-वीर टेक्नोलॉजी या माध्यमातून WRS-99 हे उत्पादन बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहे. ‘मल्टीपर्पज वाटर रजिस्टंट सोलुशन’ हे उत्पादन सरफेस माउंट डिवाइस कांपोनंट व सरफेस माउंट टेक्नॉलॉजी यावर आधारित इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये उपयोगात आणले जाते.

अजय यांनी तयार केलेले WRS-99 हे उत्पादन म्हणजे एक प्रकारचा लिक्वीड स्प्रे आहे. तो फवारल्यानंतर उपकरणाच्या प्रृष्ठभागाशी पाण्याचा संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे गंज तयार होत नाही. आर्द्रता व जंग प्रतिरोधक गुणधर्मामुळे उपकरणाला संरक्षण मिळते.

कम्युनिकेशन डिवाइसेस, लपटॉप, आईपॉड, स्ट्रीटलाइट्स या पाण्याची भीती असलेल्या उपकरणात तसेच औद्योगिक क्षेत्रातील कुलर, बाथरूम मधील दरवाजाच्या इंजिस, नट बोल्ट, स्क्रु यासाठी वापर होऊ शकतो. या उत्पादन विक्री व्यवस्था पुणे येथील व्होल्टीज पॉवर टेक्नॉलॉजी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. या उत्पादनाची किंमत परवडणारी आहे. ही २५० मिलीची बाटली ३३० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

उत्पादनाची उपयोगिता

  • औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री तसेच टेलिकम्युनिकेशन उपकरणे
  • एलसीडी, एलईडी, कम्प्युटर, लपटॉप, आयपॉड, मोबाईल मदरबोर्ड वॉटरप्रूफ करण्यासाठी उपयुक्त
  • या स्प्रेद्वारे फवारणी केल्यास पाण्यापासून लाईफ टाईम संरक्षण
  • घरगुती उपकरणात कुलर, टब, बॉडी गंज रोधक
  • प्लायवूड, एमडीएस सीटचे पाण्यापासून संरक्षण
  • बाथरूममधील लोखंडी दरवाजा, ईंजिस, होलपाससाठी गंजरोधक

नवनवीन संशोधनाची आवड

अजय विश्वकर्मा यांनी अभियांत्रिकी पदविका संपादन केली असून, त्यांना नवनवीन संशोधनाची आवड आहे. यापूर्वी त्यांनी चोरांपासून सुरक्षितता मिळविण्यासाठी उपकरण तयार केले. तसेच मोबाईल पाण्यात पडला तरी त्याचे संरक्षण करण्यासाठी लिक्वीड शोधून काढले. त्यांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरू असून, आणखी काही उत्पादनाचे त्यांना पेटंट मिळवायचे आहे. त्यांच्या संशोधनाबद्दल शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी पुसद भेटीत त्यांची प्रशंसा केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com