आयुक्त रस्त्यांवर, खड्ड्यांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : गेल्या आठ दिवसांत अनेक बैठकी घेत अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी आज प्रत्यक्ष रस्त्यांवर पाहणी केली. खड्डे बुजविताना वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने त्यांनी वाहतूक पोलिस उपायुक्तांसोबत रस्त्यावरूनच फोनवर चर्चा केली. 

शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर करा. दोन पाळीत काम करा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय आयुक्तांनी गांभीर्याने घेतला असून यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत खड्ड्यांना बुजविण्यासंदर्भात कडक निर्देश दिले आहेत. प्रारंभी कार्यकारी अभियंत्यांच्या आणि नंतर प्रत्येक झोनमधील अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांसोबत बैठक घेऊन विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. मंगळवारी एका बैठकीत त्यांनी सात दिवसांत संपूर्ण नागपूर शहरातील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने आज त्यांनी शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता आर. जी. खोत, डी. डी. मेंडुलकर, चंद्रकांत गभने उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inspection of pits, commissioner