शाळांची केवळ तपासणी, उपाययोजनांकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नागपूर : जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळांच्या तपासणीचे काम केले जाते. दोन महिन्यांपूर्वी शाळा सुरू झाल्यावरही या शाळांच्या सोयी-सुविधा आणि दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वीच शाळांच्या वर्गखोल्यांमधील गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक असताना जवळपास 165 वर्गखोल्यांत पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषदेकडून प्रत्येकवर्षी शाळांची तपासणी करून त्यांच्याकडे असलेल्या सोयी-सुविधांची माहिती मागविण्यात येते. यामध्ये शाळांमधील संरक्षक भिंत, वर्गखोल्यातील सूर्यप्रकाश, विद्युत सेवा, इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आदी अनेक बाबींचा समावेश करण्यात येतो. यासंदर्भात यंत्रणा कामी लावून तपासणी केली जाते. दरवर्षी मार्चमध्ये त्यासंदर्भात सूचना दिली जाते.
सहा महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याच्या सूचना केली होती. सूचनेवरून शिक्षणाधिकारी कार्यालयाद्वारे शाळा तपासणीची कारवाई करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी, विस्तारअधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून शाळांची तपासणी करून अहवाल देण्यात आला. यामध्ये कमी सूर्यप्रकाश असलेल्या खोल्या, विजेची सुविधा नसलेल्या शाळा, इमारतीच्या नूतनीकरणासह विविध बाबींची माहिती देण्यात आली.
जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावरही अहवालातून आलेल्या उपाययोजनांवर कारवाई होताना दिसून येत नाही. तेव्हा जिल्हा परिषदेमध्ये अहवाल तयार करण्याचा केवळ सोपस्कार पार पाडल्या जात असून, प्रत्यक्षात प्रशासनाकडून कारवाई होताना दिसून येत नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of schools news