प्रेरणा पुस्तकाच्या मुखपृष्ठाची आणि पद्मश्री...

डॉ.सुहास उगले
मंगळवार, 12 मार्च 2019

अकोला : पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या यशस्वीतेचे गमक 'मेळघाटातील देवदूत' 'पद्मश्री' डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे यांना परवालाच भारताच्या राष्ट्रपतींतर्फे पद्मश्री या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा प्रत्येक सुजाण सेवाव्रतींचा उर अभिमानाने भरून आला. आज (ता. 13) अकोल्यात जागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या उपस्थितीत या परिसरातील सेवाव्रतींचा सत्कार होतोय ही बाबच प्रेरणादायी आहे. 

अकोला : पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या यशस्वीतेचे गमक 'मेळघाटातील देवदूत' 'पद्मश्री' डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे यांना परवालाच भारताच्या राष्ट्रपतींतर्फे पद्मश्री या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा प्रत्येक सुजाण सेवाव्रतींचा उर अभिमानाने भरून आला. आज (ता. 13) अकोल्यात जागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या उपस्थितीत या परिसरातील सेवाव्रतींचा सत्कार होतोय ही बाबच प्रेरणादायी आहे. 

'पद्मश्री' नंतर अकोल्यात डॉ.रवींद्र कोल्हे यांचा गौरव होताना अकोला आणि डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या ऋणानुबंधाची किनार आहे. याची आठवण होतेय. मेळघाटच्या डोंगराळ प्रदेशात निसर्गाचे संवर्धन आणि शेतीतील नवनवीन पद्धती विषयी ज्ञान मिळविण्यासाठी पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांनी अकोल्याच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून शेतीविषयक ज्ञान मिळविले. त्यानंतर त्यांनी फंगस रेझीस्टन्ट बियाणे तयार केले. मेळघाटातील शेतक-यांना माहिती व प्रेरणा देऊन मेळघाट हा शेतकरी आत्महत्या मुक्त जिल्हा केला. यामध्ये डॉ.रवींद्र कोल्हे यांचे अमूल्य योगदान आहे. दुसरं अकोला कनेक्शन महणजे डॉ.रवींद्रजी यांचा लहान सुपुत्र राम अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी जो डॉ.रवींद्र आणि डॉ.स्मिता कोल्हे यांच्या सेवाव्रताचा वारसा कसोशीनं जपण्यासाठी  सज्ज झाला आहे. 

एवढे महान कार्य करण्याची प्रेरणा पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांना मिळाली कोठून तर याचे उत्तर आहे त्यांनी जपलेली वाचन संस्कृती!
डॉ. कोल्हे ह्यांनी विवेकानंद, महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे ह्यांची अनेक पुस्तके वाचली होती व त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. म्हणूनच त्यांनी भरभराट करून देणारी मेडिकल प्रॅक्टिस न करता गरजू लोकांची मदत करता येईल असे काहीतरी करण्याचे ठरवले. पण नेमके कुठे जावे आणि काय कार्य करावे हे दोन प्रश्न त्यांच्यापुढे होते. सुरुवात कशापासून करावी हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांचा हा प्रश्न डेव्हीड वर्नर यांनी लिहिलेल्या 'देअर इज नो डॉक्टर' ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाने सोडवला. या मुखपृष्ठावर असे चित्र होते की चार माणसे एका रुग्णाला कुठेतरी घेऊन जात होते व त्यावर असे लिहिलेले होते, हॉस्पिटल ३० मैल लांब.
हे बघून डॉक्टरांना असे जाणवले की आपण ह्याच कामाची सुरुवात केली पाहिजे जिथे कुठल्याच वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. म्हणून त्यांनी बैरागड ह्या गावाची निवड केली.

हे गाव मेळघाट जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. ह्या गावाला जाण्यासाठी अमरावतीहून पुढे प्रवास करावा लागतो, पण हरिसालहून पुढे जायला कुठलेच वाहन उपलब्ध नाही. ह्या बैरागडला जाण्यासाठी  ४० किमी इतके अंतर पायी चालत जावे लागते. या सर्व घडामोडींतून डॉ.रवींद्र कोल्हे यांनी मेळघाटातील बैरागड हे कार्यक्षेत्र निवडले आणि 'मेळघाटातील मोहोर....' 'मेळघाटातील देवदूत' ते 'पद्मश्री' पर्यंतचा त्यांचा प्रवास घडला. अशी असते ताकद अन् प्रेरणा एखाद्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspiration of cover page to Kolhe couple who got Padmashree award