पॉम्पलेट प्रथम, अलर्ट बा व्दितीय

विवेक मेतकर
Saturday, 28 December 2019

 ‘है अंधेरी रात मगर दिया जलाना कहा मना है’, या ओळींप्रमाणे डॅडी देशमुख यांनी विदर्भात परिस्थिती अनुकुल नसतानाही चित्रपट सृष्टी खेचून आणली. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. ते डॅडी देशमुख यांच्या स्मृतीत सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या महोत्सवात 165 लघुचित्रपटांपैकी 65 लघुचित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आले. यामध्ये पॉम्पलेट प्रथम, अलर्ट बा हा लघुचित्रपट व्दितीय ठरला

अकोला:  ‘है अंधेरी रात मगर दिया जलाना कहा मना है’, या ओळींप्रमाणे डॅडी देशमुख यांनी विदर्भात परिस्थिती अनुकुल नसतानाही चित्रपट सृष्टी खेचून आणली. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. ते डॅडी देशमुख यांच्या स्मृतीत सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या महोत्सवात 165 लघुचित्रपटांपैकी 65 लघुचित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आले. यामध्ये पॉम्पलेट प्रथम, अलर्ट बा हा लघुचित्रपट व्दितीय ठरला

यावेळी विचारपीठावर राजदत्त सारखं उत्तुंग व्यक्तीमत्व तर आई मला शाळेला जाऊ दे म्हणणारा श्रीनिवास पोफळे अशी दोन टोकं अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ,पंजाबराव देशमुख, डॉ. श्रीराम लागू, स्व.डॅडी देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘वळू’ आणि ‘देऊळ’ चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुळकर्णी, सुप्रसिध्द छायाचित्रकार संजय खानझोडे, दिग्दर्शक अमोल जगदाळे, विराग जाखड, कौन बनेगा करोडपतीच्या विजेत्या बबिताताई ताडे, संजय शर्मा, विजय देशमुख, प्रा.मधू जाधव, प्रा.संतोष हुसे, डॉ.संजय खडक्कार, राजेश देशमुख, प्रशांत देशमुख, प्रा.तुकाराम बिरकड, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.तुकाराम बिरकड यांनी केले तर सुत्रसंचलनाची जबाबदारी किशोर बळी आणि केतकी क्षीरसागर यांनी लिलया पेलली.

Image may contain: 1 person
अकोला ः जीवन गौरव पुरस्काराला उत्तर देताना प्रसिध्द सीने दिग्दर्शक राजदत्त.

कला उपासकांचा गौरव
दिग्दर्शन, निर्मिती, संगित, सिनेमेटोग्राफी, कॅमेरा, एडीटींग, ऑडीओग्राफी या क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी केलेल्या कलाकारांना सुध्दा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आला. अरूण देशमुख, संतोष जठार, रमीज राजा शेख, श्रेया भिडे, अमोल टाले, वैभव पल्हाडे, प्रथम पिंपळे, केतकी क्षीरसागर, विश्वास साठे, किशोर बळी, दीपक गोल्डे, सचिन गिरी, श्रीराम पालकर, शरयु तायडे, प्रवीण इंगळे, राजदत्त मानकर, सचिन निंबोकार आदींचा समावेश होता. चित्रपट सृष्टीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अकोला जिल्ह्यातील तंत्रज्ञ व कलावंताचा सुध्दा गौरव समिती तर्फे करण्यात आल्याने नवी पिढी उभी राहिली असल्याचे समाधान विचारपीठावरील मान्यवरांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

हेही वाचा -  सात्विक क्लिनीकमध्ये असात्विक काम

देश विदेशातील लघु चित्रपटांची पर्वणी
या लघु चित्रपट महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध भाषामधील लघु चित्रपटांची मेजवानी अकोलेकर कला रसीकांना लाभली. डॅडी देशमुख स्मृती चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या वर्षातच अमेरीका इंग्लंड, दुबई. द.अफ्रिका, पोर्तुगाल, पाकीस्तान, थायलंड आदी विदेशी लघू चित्रपटांसह भारतातील विविध राज्यांमधून पंजाबी, तेलगू, बंगाली, मराठी, हिन्दी, इंग्रजी, कन्नड, तामिळ सह विविध भाषेमधील 165 लघू चित्रपटांचा सहभाग होता. यापैकी उत्कृष्ठ 15 लघूपटांची निवड परिक्षकांकडून करण्यात आली.

Image may contain: 9 people, people smiling, crowd
अकोला ः नटसम्राट डॉ.श्रीराम लागू यांना आदरांजली वाहताना कलारसिक.

नटसम्राटांना आदरांजली
आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाच्या सुरुवातीलाच नटसम्राट डॉ.श्रीराम लागू यांना आदरांजली वाहण्यात आली. 

Image may contain: 1 person, close-up
विस्मरण
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करताना अनावधानाने प्रसिध्द गीतकार, लेखक, लोककवी डॉ.विठ्ठल वाघ यांच्या नावाचा विसर पडलेला दिसला. 

राजदत्त यांना जीवन गौरव
सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव. सामाजिक कमालीची आस्था असलेलं ऋषीतुल्य व्यक्तीमत्व. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे जन्मलेल्या प्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेते राजदत्त यांना दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्वाच्या मंचावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

पॉम्पलेट प्रथम, अलर्ट बा व्दितीय
या महोत्सवात 165 लघुचित्रपटांपैकी 65 लघुचित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आले. यामध्ये शेखर बनसोड दिग्दर्शीत पॉम्पलेट प्रथम, लक्ष्मीकांत सुतार दिग्दर्शीत अलर्ट बा व्दितीय तर कंवरपाल कंभोज दिग्दर्शीत इल्युजन या लघु चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी दिग्दर्शक राजदत्त, महापौर अर्चना मसने यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, रोख देवून सन्मानित करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Short Film Festival akola marathi news