Women's Day 2019 : ‘पिरियड’ स्त्री सन्मानाचा!

गुनित मोंगा
शुक्रवार, 8 मार्च 2019

महिला दिन 2019
प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हा फार महत्त्वाचा आहे. स्त्री असो वा पुरुष; प्रत्येकाला स्ट्रगल काही चुकलेला नाही. महिला म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत असताना बरीच आव्हाने आली, बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. पण सगळ्या आव्हानांना, अडचणींना सामोर जात मी आज ऑस्करपर्यंत मजल मारली आहे.

ऑस्करची बाहुली आपल्या हातात असावी, हे कला-विश्‍वातील प्रत्येकाचं स्वप्न असतं. मी हे प्रत्यक्षात अनुभवलं आहे. मी खासगी आणि व्यावसायिक आयुष्य फार जपते. प्रत्येकाला त्यात समतोल राखता आला पाहिजे. एक महिला म्हणून कलाक्षेत्रात काम करत असताना 

महिला दिन 2019
प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हा फार महत्त्वाचा आहे. स्त्री असो वा पुरुष; प्रत्येकाला स्ट्रगल काही चुकलेला नाही. महिला म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत असताना बरीच आव्हाने आली, बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. पण सगळ्या आव्हानांना, अडचणींना सामोर जात मी आज ऑस्करपर्यंत मजल मारली आहे.

ऑस्करची बाहुली आपल्या हातात असावी, हे कला-विश्‍वातील प्रत्येकाचं स्वप्न असतं. मी हे प्रत्यक्षात अनुभवलं आहे. मी खासगी आणि व्यावसायिक आयुष्य फार जपते. प्रत्येकाला त्यात समतोल राखता आला पाहिजे. एक महिला म्हणून कलाक्षेत्रात काम करत असताना 

या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मी जेव्हा कुटुंबीयांबरोबर असते तेव्हा मी फक्त त्यांचाच विचार करते; पण जेव्हा माझ्या कामाची वेळ येते तेव्हा मी अगदी जीव ओतून काम करते. 

कितीही धावपळ, काम असो; प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळ काढणं फार गरजेचं आहे. तेच मी करते. महिलेने चार भिंतींच्या बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिकलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष यांच्यामधील भेदभाव मला मान्यच नाही. प्रत्येक जण त्याच्या कामामुळे, जिद्दीने स्वतःचं विश्‍व निर्माण करतो. मी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना बरेच चांगले-वाईट अनुभव आले. एक महिला आहे म्हणून फारसं लक्षही माझ्याकडे देण्यात आलं नाही. आजही तुमचं काम कितीही उत्तम असेल आणि तुम्ही महिला असाल तर तुम्हाला डावललं जातं, हे लज्जास्पद आहे. 

मी माझ्या करिअरला सुरुवात केली, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये माझं बोलणं कोणीच कधी गांभार्याने घेतलं नाही. ही एक महिला आहे. हिच्याशी काय बोलायचं, म्हणून कित्येक वेळा मला डावलण्यात आलं. माझ्या शब्दाला मान कधीच दिला गेला नाही; पण आता मला असं वाटतं, की ते दिवस निघून गेले. माझ्या कामाने सगळ्यांना योग्य ते उत्तर मिळालं आहे. 

इतर महिलांनाही मला तेच सांगयच आहे की, कोणीही आपल्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही वा आपल्याला गांभार्याने घेतले नाही तर हार न मानता स्वतःच्या कामाने समोरच्याला उत्तर द्या. तुम्ही कामात सरस असाल, तर तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. ऑस्कर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चित्रपटसृष्टीतील लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. प्रियांका चोप्रा, मेनका गांधी यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी माझं सोशल मीडियाद्वारे कौतुक केलं. एक महिला असले तरी माझ्या कामामुळे मला मिळालेला मान एक सुखद आनंद देणारा आहे. 

स्त्री-शक्ती म्हणजे काय हे आजच्या महिलांनी त्यांच्या कामामधून सिद्ध तर केलंच आहे. आजची स्त्री ही सुशिक्षित आहे. तिचं प्रत्येक मत ठामपणे जगासमोर मांडते आहे. कलाक्षेत्रात काम करत असताना मला बऱ्याच महिला कलकारांकडून प्रेरणा मिळत गेली. अभिनेत्री तब्बूबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. मेघना गुलजार, झोया अख्तर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी करत स्त्री-शक्ती म्हणजे काय हे दाखवून दिलं आहे. या दोघीही माझ्या प्रेरणास्थानी आहेत. स्त्री-शक्ती म्हणजे काय हे या कर्तृत्ववान महिलांकडे पाहिलं की लक्षात येतं. ‘कितीही काही झालं तरी मला कोणीच थांबवू शकत नाही’, असं प्रत्येक महिलेने आज ठणकावून सांगण्याची गरज आहे. 

आयुष्यात प्रत्येक गोष्ट करणे शक्‍य आहे. फक्त तुम्हाला ती करता आली पाहिजे. आजवर बऱ्याच कलाकारांबरोबर काम केलं; पण काम करत असताना कामाचा समतोल राखता येणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा एकत्रित काम करत असताना स्त्री-पुरुष यांच्यामध्ये मतभेद होतात. प्रत्येकाचं म्हणणं प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. स्त्री असो वा पुरुष; प्रत्येकाने एकमेकाला प्रेरित केलं पाहिजे. एकमेकाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. एकमेकांचा हात धरून पुढे जायला हवं. एका स्त्रीचा विजय म्हणजे संपूर्ण स्त्री-शक्तीचा विजय ही भावना संपूर्ण विश्‍वात रुजायला हवी. 
(लेखिका ‘पिरियड. एंड ऑफ सेंटेंस’ या डॉक्‍युमेंटरीच्या निर्मात्या असून, या डॉक्‍युमेंटरीने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.)

Web Title: International Womens Day Special