सहावेळा थांबली शिवशाहिरांची मुलाखत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मुलाखतीचे आयोजन एका दुर्गा उत्सव मंडळाने केले होते. मात्र, आयोजकांच्या भोंगळ व्यवस्थापनामुळे बाबासाहेबांना स्वत:ची मुलाखत तब्बल सहावेळा थांबवावी लागली. संतप्त बाबासाहेबांनी अखेर मुलाखत सोडल्यामुळे शिवराज्याची संकल्पना जाणून घेण्यास आलेल्यांचा हिरमोड झाला.

गेल्या काही वर्षांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत ऐकण्याचा योग नागपूरकरांसाठी जुळून आला नव्हता. एका दुर्गा उत्सव मंडळाच्या विनंतीचा मान राखून बाबासाहेबांनी नागपुरात येण्यास होकार दिल्याने हा योग आला. प्रारंभी मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उद्‌घाटन बाबासाहेबांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर बाबासाहेब पुरंदरे या सत्त्याण्णव वर्षांच्या "तरुणा'ची "एण्ट्री' झाली अन्‌ दुसरीकडे नागरिकांनी घरची वाट धरण्यास सुरुवात केली. हे बघून "तुम्हाला घरीच जायचे होते तर मला कशाला बोलावले' असा संतप्त सवाल बाबासाहेबांनी केला.
सतत उठून जाणाऱ्या नागपूरकरांमुळे मुलाखतीत एक-दोनदा नव्हे तर तब्बल सहावेळा विघ्न आले. लोक सातत्याने उठून जात. याचा बाबासाहेबांना होत असलेला मनस्ताप स्पष्टपणे दिसून येत होता. सायंकाळी साडेसातला सुरू होणारी मुलाखत रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी प्रारंभ झाल्याने नागपूरकरांच्या संयमाचाही बांध फुटला होता. मुलाखत सुरू झाल्यानंतर दहा वाजतापर्यंत एका प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेता आले. मुलाखत सुरू होण्यास उशीर झाल्याने नागपूरकरांचे उठून जाणे सुरूच होते. अखेर बाबासाहेबांनी मुलाखत थांबविण्याचा निर्णय घेत अधिक मनस्ताप टाळला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interview with Shivshahira stopped six times