file photo
file photo

इच्छुकांनीच घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती!

नागपूर : कॉंग्रेसच्या इच्छुक उमेवारांच्या प्रक्रियेवर प्रश्‍न उपस्थित केले जात असून जे लढणार आहेत तेच मुलाखती कसे काय घेऊ शकतात, असा सवाल अनेकांनी खासगीत बोलताना केला आहे.
विधानसभा निवडणूक लढणाऱ्या कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती आज देवडिया भवन येथे घेण्यात आल्या. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक आणि प्रदेशचे निरीक्षक म्हणून आमदार नसिम खान आले होते. पदाधिकारी म्हणून शहराध्यक्ष विकास ठाकरे, अतुल लोंढे, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार आदी नेत्यांचा मुलाखती घेणाऱ्यांमध्ये समावेश होता. विकास ठाकरे यांनी पश्‍चिम विधानसभेसाठी मुलाखत दिली. मात्र याच मतदारसंघातून इतर इच्छुकांच्या मुलाखती घेणाऱ्यांमध्येही त्यांचा समावेश होता. असाच प्रकार दक्षिण आणि पूर्व नागपूर विधानसभेतही झाला. अभिजित वंजारी यांनी पूर्व नागपूरमधून यापूर्वी निवडणूक लढली आहे. यावेळीसुद्धा ते लढण्याची तयारी करीत आहेत. त्यांच्यासह पूर्ववर अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री अनेकांनी मुलाखती दिल्या. विशाल मुत्तेमवार यांनी आधीच दक्षिणेवर दावा सांगितला आहे. इतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्याऱ्यांमध्येही ते पदाधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यामुळे अनेकांची अडचण झाली. मोकळेपणाने त्यांना बोलता आले नाही. आपला विरोधक म्हणूनही ते इच्छुकांकडे बघू शकतात, अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com