संशयित चौघांची चौकशी; वाघिण मृत्यू प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

धाबा (चंद्रपूर) :  वाघीण मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वनविभागाने चक्क वर्षभरापूर्वी घडलेल्या गुन्हा उकरून काढला आहे. थिमेंटचा गोळा खाल्ल्याने म्हैस दगावली, याची तक्रार लाठी पोलिस स्टेशनला होती. यात समावेश असलेल्या चौघांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप वनविभागाचे हात रिकामेच आहेत.

वाघीण मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. मृत रानडुकराचे मास खाल्याने वाघीण दगावली, असा संशय वनविभागाला आहे. त्यामुळे रानडुकरावर कुणी विष प्रयोग केला, याचा शोध विभाग घेत आहे. प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले असतानाच गावकऱ्यांच्या विरोधाने तपासात अळथळा निर्माण झाला. अशात वर्षभरापूर्वी घडलेल्या एका गुन्ह्याचे प्रकरण वनविभागाने बाहेर काढले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. साधारणत वर्षभरापूर्वी थिमेंट मिश्रीत कणकेचे गोळा खाल्याने म्हैस दगावली. म्हैस मालकाने गावातील चार व्यक्ती विरोधात लाठी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती. या चौघांकडूनच रानडुकराचा शिकारीसाठी थिमेंटचा गोळ्यांचा वापर झाला असावा अशी शंका वनविभागाला आहे. त्या दिशेने वनविभागाने तपासाची चक्रे फिरविली आहेत.

कॅमेऱ्याला वाघाची हुलकावणी
घटनास्थळी वेगवेगळे पगमार्क आढळून आले. त्यात शेतशिवारात वाघ फिरत असल्याची चर्चा गावात होती. सत्य जाणून घेण्यासाठी वनविभागाने शेतात कॅमेरे लावलेत मात्र कॅमेरात वाघ कैद झाला नाही. काही शेतात आढळलेले पगमार्क मृत वाघिणीचे आहेत, असे वनविभाग सांगत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigation of the suspected fours; Tiger Death Case