राज्यातील पहिली इस्लाम धर्माची देवराई अमरावती जिल्ह्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

अमरावती - देवराईमुळे आज मोठ्या प्रमाणात देशातील जंगलांचे क्षेत्र राखीव ठेवण्यास मदत झाली आहे. विशेषत: देशात अशा देवराई हिंदू धर्मात बघायला मिळतात. परंतु, अमरावती जिल्ह्यात प्रथमच इस्लाम धर्माच्या देवराईची नोंद झाली आहे. 

या देवराईला पीरबाबाचा तरोडा म्हणून ओळखले जाते. या देवराईत 2.5 एकर जागेत वडाचे झाड पसरले आहे. त्याचबरोबर झाडाखाली पीरबाबांचा दर्गा आहे. महत्त्वाचे म्हणजे ही देवराई इस्लाम धर्माची असली तरी सर्व धर्माचे लोक येथे येतात. मांसाहार करून येणाऱ्या व्यक्‍तीला देवराईत प्रवेश मिळत नाही. कोणाला झाडाची फांदी तोडायलासुद्धा परवानगी नाही. 

या वडाच्या झाडाला त्रास दिल्यास झाड शाप देईल, असा ग्रामस्थांचा विश्‍वास असल्याचे विद्यार्थी अक्षय ओंकार याने सांगितले. त्याने सर्व गोष्टींवर संशोधन केले. ते "झु प्रिंट' या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे. या देवराईत असलेल्या महाकाय वटवृक्षातून एक छोटासा नाला वाहतो व तो मालखेड तलावाला मिळतो. अशा प्रकारच्या देवराईची नोंद गोवा राज्यात झाली आहे. देवराईची शेवटची मोजणी महाराष्ट्रात बीएनएच या संस्थेने केली. त्यांनी राज्यातील 2,408 देवराईंची नोंद केली आहे. त्यातील बहुतांश हिंदू धर्मीयांच्या आहेत. मुस्लिम धर्मीयांच्या देवराईची नोंद कुठेही नाही. त्यामुळे ही महाराष्ट्रातील पहिलीच इस्लाम धर्माची देवराई ठरली आहे. या अभ्यासामुळे भविष्यात धर्माच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करण्यास मदत होईल आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश पोहचेल, असा विश्‍वास अक्षय ओंकार याने व्यक्त केला. 

संजय सध्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असून पर्यावरणावर अभ्यास करीत आहे.

Web Title: Islam is the state religion devarai first Amravati district