अभ्यासमंडळावरील सदस्यांचा मुद्दा कुलपतींच्या दालनात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळांवर अपात्र सदस्यांची निवड झाल्याची तक्रार नुटाने कुलगुरूंकडे केली होती. परंतु, कुलगुरूंनी या अपात्र सदस्यांना क्‍लीन चिट दिल्यामुळे ते सदस्य अभ्यासमंडळांवर कायम ठेवण्यात आले. त्यामुळे आता नुटाने राज्यभवनाचा दरवाजा ठोठावला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळांवर अपात्र सदस्यांची निवड झाल्याची तक्रार नुटाने कुलगुरूंकडे केली होती. परंतु, कुलगुरूंनी या अपात्र सदस्यांना क्‍लीन चिट दिल्यामुळे ते सदस्य अभ्यासमंडळांवर कायम ठेवण्यात आले. त्यामुळे आता नुटाने राज्यभवनाचा दरवाजा ठोठावला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नियमित अभ्यासमंडळांची संख्या जवळपास 48 आहे. या अभ्यासमंडळांवर कुलगुरूंनी काही महिन्यांपूर्वी सदस्यांची निवड करून अभ्यासमंडळे गठित केली. यामध्ये कुलगुरूंकडून नामित करण्यात आलेल्या सदस्यांपैकी 10 सदस्य हे अपात्र असल्याची तक्रार नुटाचे विवेक देशमुख व इतर सदस्यांनी कुलगुरूंकडे केली होती. कुलगुरूंकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून शेवटी नुटाने सरळ कुलपतींकडे तक्रार केली आहे. अभ्यासमंडळांवर सदस्यांची नियुक्‍ती करताना कायद्यानुसार आवश्‍यक पात्रता असणे गरजेचे आहे. काही सदस्यांजवळ नियुक्‍तीबाबत आवश्‍यक पात्रता नसल्याचे नुटाचे म्हणणे आहे. त्यामुळे नुटाने त्यांच्यावर अपात्र असल्याचा आक्षेप घेऊन त्याबाबत कुलपतींकडे तक्रार केली आहे.
तक्रारकर्त्यांमध्ये डॉ. पी. बी. रघुवंशी, माजी परीक्षानियंत्रक सिनेट सदस्य डॉ. बी. आर. वाघमारे, डॉ. एस. पी. गावंडे, डॉ. विजय कापसे, डॉ. नितीन चांगोले, डॉ. अशोक भोजराज आदींचा समावेश आहे.

अभ्यासक्रम तयार करणे हे प्रथम महत्त्वाचे कर्तव्य अभ्यासमंडळाचे आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम ठरविण्यासाठी पदव्युत्तर शिक्षकांना नामित करणे अपेक्षित असताना ज्या संलग्नित महाविद्यालयांत पदव्युत्तर वर्गच शिकवले जात नाहीत, अशा महाविद्यालयांतील शिक्षकांना कुलगुरू अभ्यासमंडळावर नामित करीत असतील, यापेक्षा वेगळे दुर्दैव काय असावे.
-डॉ. विवेक देशमुख, नुटा.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of the members of the faculty is in the Chancellor's office