आयटी कंपन्यांत अनिश्‍चिततेचे सावट - राहुल पटवर्धन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नागपूर - आयटी कंपन्यांचा कमी होत चाललेला नफा, अमेरिका व इतर देशांची नवीन धोरणे, रोजगाराच्या दृष्टीने विविध देश घेत असलेले सुरक्षात्मक धोरणांमुळे भारतीय आयटी व्यावसायिक व नवीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, नवीन कार्य पद्धतींनुसार डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास तसेच भारतीय कंपन्यांनी देशांतर्गत बाजारपेठेवर व प्रॉडक्‍ट इनोव्हेशनवर लक्ष केंद्रित केल्यास आयटी व्यावसायिकांना या अनिश्‍चिततेच्या काळातदेखील संधी उपलब्ध होऊ शकतात. 

गेल्या काही वर्षांत आयटी कंपन्यांच्या नफ्याचा टक्का दोन अंकीवरून एक अंकी होत चालला आहे. यामुळे बेंच लेबरची जुनी पद्धत नाहीशी होत चालली आहे. यामुळे नवीन रोजगार भरतीवर याचा परिणाम होत आहे. या शिवाय प्रोसेस ऑटोमेशन व त्याच त्या कामांसाठी आता वापरण्यात येणारे बोटस यामुळे या भरतीवर अधिक परिणाम झाला आहे. तसेच ग्राहकांकडून येणाऱ्या नवीन कामांसाठी नवीन कौशल्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर असलेल्या आयटी व्यावसायिकांची संख्या यासाठी सज्ज नाही, असे मत एनआयआयटीचे ग्लोबल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पटवर्धन यांनी व्यक्त केले.

रोजगाराच्या दृष्टीने अनेक देशांनी संरक्षणात्मक पवित्रा स्वीकारला आहे. त्यानुसार व्हिसाच्या धोरणांमध्ये बदल केला आहे. जुन्या सॉफ्टवेअरच्या पद्धतींवर अवलंबून व्यावसायिक मॉडेल्स आता बदलले आहे. ऑटोमेशन, क्राउडसोर्सिंग व क्‍लाउडवर आधारित बिझनेस मॉडेल्स उदयाला येत आहेत. यामुळे आयटी व्यावसायिक व नवीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसमोर रोजगाराचे मोठे आव्हान आहे. यामुळेच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत. 
 
कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कपात
यावर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येदेखील २५-३० टक्के कपात झाली आहे. सध्या जागतिक अनिश्‍चितता असली तरी स्टार्टअप व प्रॉडक्‍ट इनोव्हेशनद्वारे व भारतीय आयटी कंपन्यांनी देशांतर्गत बाजारपेठेत लक्ष्य केंद्रित केल्यास चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, असे ते म्हणाले.

Web Title: IT companies have uncertainty