महामानवांचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे दुर्दैवी

नागपूर : डॉ. सुखदेव थोरात यांना पुरस्कार प्रदान करताना सुशीलकुमार शिंदे. बाजूला उपस्थित डॉ. शरद निंबाळकर, गिरीश गांधी, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि इतर मान्यवर.
नागपूर : डॉ. सुखदेव थोरात यांना पुरस्कार प्रदान करताना सुशीलकुमार शिंदे. बाजूला उपस्थित डॉ. शरद निंबाळकर, गिरीश गांधी, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि इतर मान्यवर.

नागपूर : स्वातंत्र्यापासून आपल्या देशाने जातीय निर्मूलनाचा वसा घेतला. मात्र, राजकीय लालसेमुळे दुर्दैवाने पुन्हा जातीयवाद वाढत असल्याचे दिसून येते. हा प्रकार सर्वांसाठीच घातक असून, महामानव डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राजकीय फायद्यासाठी टाळावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
मारवाडी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांना प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृषितज्ज्ञ व पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, महेश पुरोहित, विजय मुरारका, डी. आर. मल, डॉ. अनिल हिरेखन, मोविंद्र अग्रवाल आणि अनिल राठी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, दलित व्यक्‍ती एकमेकांतही जातिभेद करतो, ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने एकत्र यायला हवे. देश सुधारायचा असेल, तर जाणीवपूर्वक तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. थोरात म्हणाले, समाजसुधारकांचे कौतुक करण्याऱ्यांची फार कमतरता आहे. समाजाने कौतुकाची थाप दिल्यास प्रत्येकालाच प्रोत्साहन मिळेल. माझ्या जीवनात मी नेहमी धोरणात्मक कामात लक्ष्य दिले आणि त्याचा देशाला मोठा फायदा झाला. सत्तेचा उपयोग गरिबांसाठी केल्यास त्याचे वेगळे सुख मिळत असल्याचे थोरात यांनी नमूद केले.
शरद निंबाळकर यांनी कृषिक्षेत्रात आर्थिक क्रांतीची गरज व्यक्‍त केली. कापसाचे आर्थिक नियोजन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार सुधीर बाहेती यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com