आयटीआयची विद्यार्थीनी पुनम अकाेल्यातच थाटणार कंपनी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

महिलांसाठी करणार राेजगार निर्मिती -
अकाेल्यातच फ्रुट्स प्राेसेसींगचे युनिट थाटून विविध पदार्थांचे उत्पादन घेणार असल्याची माहिती पुनमने दिली. या माध्यमातून आयटीआयच्या प्रशिक्षणार्थीनींना तसेच स्थानिक महिलांना राेजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचा पुनमने सांगितले.

अकाेला - चार वर्षांच्या अथक परिश्रमातून मिळालेल्या अनुभवाचं गणित जुळवत आयटीआयच्या विद्यार्थीनीने जिद्द बांधली ती स्वतःचीच कंपनी थाटण्याची. हे शिखर गाठायचं अद्याप बाकी असलं, तरी तिचा हा प्रवास तरुणाईला विशेषतः उद्याेग क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

माेठी उमरी परिसरातील रहिवाशी किशाेर शेगावकर यांची मुलगी पुनम हीने 2011 साली मुलींच्या आयटीआयमधून ‘फ्रुट्स ॲन्ड व्हेजिटेबल प्राेसेसिंग’ हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला. पण, आयटीआयपूर्वी असाही कुठला अभ्यासक्रम असू शकताे हे ठाऊक नव्हतं. काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून उत्सुकताही हाेती. पुनमची उत्सुकता पाहून आयटीआयचे निदेशक किशाेर ठाकरे यांनी देखील तिला प्राेत्साहन देत याेग्य मार्गदर्शन केले. पण, अभ्यासक्रम पूर्ण हाेताच बघितलेल्या स्वप्नांपुढे संकटाचं डाेंगर येऊन ठेपलं. सहा महिने झाले, तरी शिकाऊ उमेदवार म्हणूनही कुठे संधी मिळाली नाही. पण, सर्वसामान्य घरातील पुनमनं जिद्द साेडली नाही अन् जिल्‍ह्याबाहेर संधीचा शाेध सुरू केला. अखेर सात-आठ महिन्यांच्या संघर्षनंतर जळगावच्या एका फ्रुट्स प्राेसेसिंग युनिटमध्ये सुपरवायझर म्हणून संधी मिळाली. या संधीच्या माध्यमातून आपल्या कौशल्याचा हुनर दाखवत पुनमनं सुपरव्हायझर ते वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत मजल मारली. चार वर्षांचा हा संघर्ष आणि त्यातून आलेल्या अनुभवातून परिपक्व झालेल्या पुनमनं आता चक्क स्वतःचीच कंपनी थाटण्याचा संकल्प केला आहे.

आयटीआयमध्ये फ्रुट्स ॲन्ड व्हेजिटेबल्स प्राेसेसींग या विषयाच्या माध्यमातून नवीन शिकायला मिळाले. आयटीआयचे निदेशक किशाेर ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून आणि चार वर्षांच्या संघर्षातून स्वतःची कंपनी थाटण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे.
- पुनम शेगावकर, माजी विद्यार्थीनी, आयटीआय (मुली)

पुनम शेगावकरमध्ये शिक्षण्याची उत्सुकता हाेती.शिवाय, तिने संघर्षही तसेच केले. त्यामुळेच तिला यश मिळाले आहे.
- किशाेर ठाकरे, निदेशक, आयटीआय (मुली)

Web Title: The ITIs student Ponam will run the company in Akola