जे. डी. अभियांत्रिकीला स्वायत्त दर्जा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर: जयदेव शिक्षण संस्थेद्वारे संचालित जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट महाविद्यालयाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळणारे जे. डी. अभियांत्रिकी हे प्रथमच महाविद्यालय ठरले आहे.

नागपूर: जयदेव शिक्षण संस्थेद्वारे संचालित जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट महाविद्यालयाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळणारे जे. डी. अभियांत्रिकी हे प्रथमच महाविद्यालय ठरले आहे.

देशात उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचे धोरण विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अवलंबिले आहे. त्यानुसार नियमावली तयार करून महाविद्यालयांना स्वायतत्ता प्रदान करण्यात येते. यानुसार जे. डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात जुलै महिन्यात तज्ज्ञ समितीने भेट दिली होती. समितीने महाविद्यालयाला नॅकद्वारे प्रदान करण्यात आलेला सीजीपीए, एनबीए मानांकन आणि विविध सोयी-सुविधांची तपासणी केली. यावरून समितीने स्वायत्त दर्जासाठी महाविद्यालयाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तीन वर्षांपूर्वी महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटू) संलग्नीकरण घेतले. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत महाविद्यालयाने गुणवत्ता वाढवत, स्वायत्त दर्जा मिळविला. महाविद्यालयात चॉईस बेस क्रेडिट सिस्टम आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांना क्रेडिट दिले जाते. महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाल्याबद्दल अध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव अजय अग्रवाल, विश्‍वस्त जयेश गोयल, संचालक डॉ. प्रशांत माहेश्‍वरी, सुरेश बंग, कार्यकारी संचालक अविनाश दोरसटवार, प्राचार्य सुभाष चौधरी, उपप्राचार्य डॉ. श्रीकांत सोनेकर यांनी सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
रायसोनीच्या दुसऱ्या महाविद्यालयालाही स्वायत्तता
जे. डी. अभियांत्रिकीपाठोपाठ रायसोनी शिक्षण समूहातील नागपूर आणि पुणे येथील रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या महाविद्यालयालाही विभागाने स्वायत्तता प्रदान केली आहे. रायसोनी शिक्षण समूहातील तिसरे आणि चौथे महाविद्यालय असून यापूर्वी नागपुरातील एक आणि पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आलेली आहे. नागपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी हे दुसरे स्वायत्त महाविद्यालय ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: J. D. Autonomous status for engineering