जबलपूर एक्‍स्प्रेस तांत्रिक बिघाडामुळे खोळंबली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

अमरावती : अमरावती रेल्वेस्टेशनचा प्लॅटफॉर्म सोडताच अमरावती - जबलपूर एक्‍स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ही गाडी अर्धा तास अमरावती स्थानकावरच अडकून पडली. अखेर सव्वा सहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर तीने अमरावती स्टेशन सोडले.
अमरावती- जबलपूर एक्‍स्प्रेस दररोज सायंकाळी 5.45 वाजता अमरावती स्टेशनवरून सुटते. बुधवारी (ता.2) अगदी वेळेवर गाडीने प्लॅटफॉर्म सोडल्यानंतर लगेच इंजिनचा एअरविंग निकामी झाला. जवळपास अर्धा तास दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर सव्वासहाच्या सुमारास ही गाडी अमरावतीवरून जबलपूरकडे रवाना झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jabalpur Express disrupted due to technical breakdown

टॅग्स