जय श्रीराम बॅंकेत कोट्यवधीचा घोटाळा

file photo
file photo

नागपूर : कोतवालीतील एस. डी. हॉस्पिटल चौकातील जय श्रीराम बॅंकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मॅनेजरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. खेमचंद सीताराम मेहरपुरे (बॅंकेचे अध्यक्ष), योगेश मनोहर चरडे (उपाध्यक्ष) आणि मॅनेजर सुनीता केशवराव पोळ (वय 42) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगनाडे रोडवर एस. डी. हॉस्पिटल चौकात जय श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक स्थापन करण्यात आली. यापूर्वी ही क्रेडिट को-ऑप. सोसायटी होती. त्यानंतर विस्तार वाढवून बॅंकेत रूपांतर केले. या बॅंकेचे अध्यक्ष खेमचंद मेहरपुरे तर उपाध्यक्ष योगेश चरडे आहेत. बॅंकेत सुनीता पोळ ही मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 6 फेब्रुवारी 2017 ते 10 फेब्रुवारी 2019 या दरम्यान ग्राहकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जय श्रीराम बॅंकेने कमी वेळात जास्त नफा आणि जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवले. आरडी, एफडी आणि दैनिक बचत योजना बॅंकेने सुरू केली होती. व्याजाची रक्‍कम पाहता अनेक ग्राहकांनी गुंतवणूक केली. यामध्ये दिनेश वासूदेवराव पडेगावकर (55, रा. तुलसीबाग रोड, महाल) यांचाही समावेश होता. त्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशावर काही दिवस व्यवस्थित व्याज मिळत होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा रक्‍कम गुंतवली. दोन वर्षांत बॅंकेची मॅनेजर सुनीता पोळने घोटाळा करीत ग्राहकांचे पैसे योजनांऐवजी खासगी कामासाठी वापरणे सुरू केले. वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे अनेक ग्राहकांना बॅंकेच्या कारभारावर संशय आला. त्यामुळे काहींनी बॅंकेचा अध्यक्ष खेमचंद आणि उपाध्यक्ष योगेश चरडे यांची भेट घेतली. मात्र, त्यांनीही उत्तर देण्यास टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने ग्राहकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, कोतवाली पोलिसांनी योग्य ते गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे ग्राहकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. न्यायालयाच्या आदेशान्वये कोतवाली पोलिसांनी जय श्रीराम अर्बन बॅंकेवर गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com