Maharashtra vidhansabha 2019 : जयस्वाल, रेड्डींसह यादव यांचे अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

रामटेक (जि. नागपूर) : तीन दमदार उमेदवारांच्या "दमदार' रॅलींनी रामटेक दुमदुमून गेले. शहराच्या दोन टोकांकडून शहरात दाखल झालेल्या रॅली पाहून रामटेकवासी अवाक झाले. कॉंग्रेसचे उदयसिंग यादव, भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी तर माजी आमदार ऍड. आशीष जयस्वाल व चंद्रपाल चौकसे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. 

कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीने रामटेक शहरात "माहोल' निर्माण झाला होता. रामटेक विधानसभेसाठी एकूण 15 उमेदवारांनी दावेदारी दाखल केली असून आज छाननीनंतर आणि 7 ऑक्‍टोबरला नाव मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. आज सकाळी दहा वाजतापासून शहराचे रस्ते वेगाने धावू लागले होते. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांची वर्दळ होत होती. सर्वप्रथम बसस्थानकाजवळील शिवाजी पार्क येथून भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या रॅलीनंतर रेड्डी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. त्यानंतर कॉंग्रेसचे उमेदवार उदयसिंग यादव यांनीही तहसील कार्यालय गाठले. मात्र, त्यांची आणि माजी आमदार आशीष जयस्वाल यांच्या रॅलीची गांधी चौक ते नेहरू चौकादरम्यान समोरासमोर आल्या. यावेळी पोलिसांच्या नजरेत यावेळी किंचित चिंता होती. मात्र, कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व पार पडले. आशीष जयस्वाल व कॉंग्रेसचे गज्जू यादव यांनी अर्ज सादर केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaiswal, Reddy along with Yadav filed an application