अकोल्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

योगेश फरपट पाटील
बुधवार, 10 मे 2017

शासनाने या हंगामापासून राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरुवात केली अाहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ५० गावतलाव व १० पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत १० पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन करण्यात आले. 

अकोला - शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेचा शुभारंभ बुधवारी (ता.१०) जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील कोहळ येथील तळ्यातून गाळ काढून या योजनेस प्रारंभ करण्यात आला. 

शासनाने या हंगामापासून राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरुवात केली अाहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ५० गावतलाव व १० पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत १० पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन करण्यात आले. 

या योजनेचजा शुभारंभ करण्यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे हे दौऱ्यावर आले होते. त्यांनी सकाळी अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर, सिसा बोंदरखेड, घुसरवाडी येथे जाऊन जलसंधारण व जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. त्यांनंतर दुपारी बार्शीटाकळी तालुक्यातील कोहळ येथे रवाना झाले. कोहळ शिवारातील तलावातील गाळ काढून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर यांच्यासह जिल्हाधिकारी अास्तीककुमार पांडेय, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार यांच्यासह इतर विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. जलसंधारणाची कामे अधिकाधिक करून पाणी मुरविण्यासाठी, शेती समृद्ध करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे अावाहन त्यांनी या दाैऱ्यात केले.

Web Title: jal yukta shivar work starts in Akola