जनाहारमधून चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

नागपूर - रेल्वेप्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र रेल्वेच्याच जनाहारमधून चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात आहे. नियमित "लक्ष्मीदर्शन' होत असल्यानेच संबंधितांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. 

रेल्वेप्रवासादरम्यान स्वस्त आणि दर्जेदार जेवण उपलब्ध व्हावे यासाठी नागपूर रेलवेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर जनाहार आहे. पूर्वी रेल्वेकडूनच जनाहारचे संचालन व्हायचे, आता मात्र ते खासगी हातात सोपविण्यात आले आहे. पदार्थांच्या विक्रीचे दर ठरले असतानाही जनाहारचे कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे प्रवाशांकडून शुल्काची आकारणी करीत आहेत. एक दोन रुपये नव्हे तर चक्क 10 ते 50 रुपयांपर्यंत अतिरिक्त वसुली सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी खाद्यपदार्थ खरेदी करणाऱ्या प्रत्येकाला बिल देण्याचे निर्देश दिले आहेत. जनाहारमध्ये मात्र या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत आहे. मागणी करूनही बिल नाकारले जाते. परिणामी प्रवाशांचा अपेक्षाभंग होत असून गरिबांना कमी दरात अन्न मिळावे या रेल्वेच्या धोरणालाच हरताळ फासला जात आहे. सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांच्याकडे याप्रकाराबाबत विचारणा करताच जनताखानासंदर्भात अनेक तक्रारी असून लवकरच कारवाई करण्याची ग्वाही दिली. 

घाईतील प्रवाशांना फटका 
फलाट क्रमांक नेहमीच व्यस्त असतो. गाडी येताच प्रवासी जनाहार गाठून खाद्यपदार्थ खरेदी करतात. घाईत असणाऱ्या प्रवाशांना बेभाव दरात पदार्थांची विक्री केली जाते. गाडी सुटण्याच्या भीतीने प्रवासी अधिक पैसे मोजतात. शिवाय तक्रारही करीत नाहीत. याचाच फायदा विक्रेते घेत आहेत.

Web Title: Janahara from the high rate of food sales