दुसऱ्या पेपरमधील गणिताने फोडला घाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) रविवारी (ता. ८) शहरातील ४० केंद्रांवर २६ हजारांवर विद्यार्थ्यांनी ‘जेईई मेन’ परीक्षा दिली. जेईई मेन परीक्षेतील बी. आर्च आणि बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या पेपर-२ च्या गणितातील प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला. मात्र, पेपर- १ अगदी सोपा आल्याने बी. टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बराच दिलासा मिळाला. 

सीबीएसईतर्फे दहावी आणि बारावीच्या पेपर लीकनंतर केंद्रावरील नियमांमध्ये बदल करण्यात आला होता. सकाळी साडेनऊ वाजता पेपर-१ सुरू झाला.

यामध्ये गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासाठी प्रत्येकी ३० प्रश्‍न विचारण्यात आले. गतवर्षीप्रमाणेच पेपर सोपा असल्याचे आयआयटी होमच्या निशा कोठारी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गणिताचा पेपर थोडाफार ‘लेंदी’ असल्याने विद्यार्थ्यांना त्याला वेळ द्यावा लागला. मात्र, दुपारी दोन ते पाचदरम्यान घेण्यात आलेल्या पेपर-२ मधील गणित विषयाचा पेपर बराच कठीण असल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला. यामध्ये गणित, ड्रॉइंग आणि ॲप्टिट्यूड अशा तीन गटांत विभागला होता. यापैकी सर्वांत जास्त कठीण भाग गणिताचा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याशिवाय ड्रॉइंगसाठी विद्यार्थ्यांना बराच वेळ द्यावा लागला. दरम्यान, गतवर्षीचा विचार केल्यास जेईईचे दोन्ही पेपर सोपे असताना, खुल्या गटातील कट ऑफ ८० वर गेला होता. त्यामुळे या वर्षीही तो जाण्याची शक्‍यता असल्याचे दिसून येते. 

काटेकोर नियम 
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचा पेपर लीक झाल्यामुळे या वेळी जेईई मेन परीक्षेत सीबीएसईने बरेच काटेकोर नियम लावले होते. सकाळी साडेनऊसाठी विद्यार्थ्यांना सात वाजतापासूनच रिपोर्टिंग करण्यास सांगण्यात आले होते. नागपुरात जेईई मेनसाठी केंद्र असल्याने विभागातील गोंदिया, भंडारा, वर्धा आणि मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील छिंदवाडा, बालाघाट, बैतूलसारख्या जिल्ह्यांतून विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रावर मेटलच्या कुठल्याही वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली होती. अनेक परीक्षार्थ्यांना जोडेही बाहेर काढण्यास सांगण्यात आले. सीबीएसईद्वारे पेन देण्यात येणार असल्याने तोसुद्धा आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आली होती.

Web Title: JEE main exam maths subject