मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांचे संरक्षण करते 'जेनी'; सात वर्षांत अनेक गुन्हे उघडकीस

Jenny protects tigers at the Melghat Tiger Reserve
Jenny protects tigers at the Melghat Tiger Reserve

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांसह वन्यजीवांच्या संरक्षणार्थ श्‍वान तैनात आहे. तिचे नाव जेनी. तिचा मंगळवारी (ता. १३ ऑक्‍टोबर) वाढदिवस होता. ती आता सात वर्षांची झाली आहे. या सात वर्षांच्या कालखंडात जेनीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे. बहुतेक गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. जेनीच्या नावाने शिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तिचे नाव ऐकताच शिकाऱ्यांना थरकाप सुटतो.

१३ ऑक्‍टोबर २०१३ रोजी जेनीचा जन्म झाला. जर्मन शेफर्ड जातीच्या या मादी श्‍वानाने मध्य प्रदेशातील भोपाळ येथे असलेल्या पोलिस विभागाच्या २३ बटालियन ॲकॅडमीमधून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर जेनी अकोट-मेळघाट व्याघ्रप्रकल्पात २०१५ मध्ये रुजू झाली. तेव्हापासून अद्यापही जेनीचा दबदबा दिसून येत आहे. सध्या व्याघ्रप्रकल्पात जेनी एकमेव प्रशिक्षित श्‍वान आहे. जेनीची ओळख स्निफर डॉग म्हणून आहे.

वाघ आणि वन्यजीवांचे शिकारी, त्यांची कातडी-अवयव यासह वनगुन्ह्यातील गुन्हेगारांना शोधून काढण्याचे खास प्रशिक्षण जेनीने पूर्ण केले आहे. जेनीमुळे व्याघ्रप्रकल्पातील अनेक गुन्हे उघडकीस आले. पुढेही जेनी असेच गुन्हेगारांना शोधणार यात शंका नाही.

जेनीचा जन्मदिवस व्याघ्रप्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. या सात वर्षांच्या काळात जेनीने व्याघ्रप्रकल्पात आपला दबदबा निर्माण केला आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात रुजू झाल्यापासून आतापर्यंत जेनीने विविध तीस गुन्ह्यांतील चाळीस आरोपींचा छडा लावण्यास यश मिळविले आहे.

शिस्तप्रिय म्हणून ओळख

जेनी जशी गुन्हेगारांना शोधण्यात माहीर आहे तशीच कर्तव्यावर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारून शिस्तीचे पालन करणारी म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे जेनीला राहण्यासाठी स्वतंत्र शासकीय निवास आहे. क्षेत्रभेटीवर जाताना तिच्यासाठी शासकीय वाहन आहे.

आहार, आरोग्याची काळजी

सरकारच्या नियमाप्रमाणे जेनीसाठी खास आहार आहे. यामध्ये दररोज अर्धा किलो मांस, सकाळी व सायंकाळी दूध आणि पेडिग्री हा पूरक आहार दिला जातो. तिच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. वर्षातून एकदा रेबीज इंजेक्‍शन, तर तीन महिन्यांनी जंतनाशक औषध दिले जाते.

खास प्रशिक्षण केले पूर्ण
वाघ आणि वन्यजिवांचे शिकारी, त्यांची कातडी-अवयव यासह वनगुन्ह्यातील गुन्हेगारांना शोधून काढण्याचे खास प्रशिक्षण जेनीने पूर्ण केले आहे. जेनीमुळे व्याघ्र प्रकल्पातील अनेक गुन्हे उघडकीस आले असून बहुतेक आरोपीना जेरबंद करण्यास यश मिळाले आहे.
- लक्ष्मण आवारे,
सहायक वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्रप्रकल्प

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com