जयताळा रस्त्यासाठी झाडांच्या मुळावर प्रहार

नागपूर :  रस्त्याचे काम करताना पाडण्यात आलेले झाड, दुसऱ्या छायाचित्रात जेसीबीने झाडांच्या बाजूची माती काढल्याने सैल झालेली मुळे.
नागपूर : रस्त्याचे काम करताना पाडण्यात आलेले झाड, दुसऱ्या छायाचित्रात जेसीबीने झाडांच्या बाजूची माती काढल्याने सैल झालेली मुळे.

नागपूर : शहरात पर्यावरणाचा ऱ्हास करीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात असल्याचे चित्र आहे. जयताळा मार्गावर सिमेंट रस्त्यांसाठी खोदकाम करताना बेजबाबदार कंत्राटदार कंपनीने झाडांच्या मुळावरच प्रहार केला. सध्या वादळ व पावसाचे दिवस असून या मार्गावरील जवळपास दहा झाडे पडण्याची शक्‍यता आहे. वाहतुकीस अडथळा नसलेल्या झाडांचा बळी देऊन रस्ता केला जात असल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिलांनीही संताप व्यक्त करीत महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर आश्‍चर्यही व्यक्त केले.
महापालिकेने ऑरेंज सिटी स्ट्रीटला समांतर असलेल्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे कंत्राट मधुकॉन या कंत्राटदार कंपनीस दिले आहे. या कंपनीने आणखी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली. जयताळा बाजाराला लागून असलेल्या या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी जेसीबीने रस्ता खोदण्यात येत आहे. रस्ता खोदताना कंत्राटदार कंपनीकडून फूटपाथपर्यंत खोदकाम करण्यात येत आहे. फूटपाथला लागूनच मोठ्या प्रमाणात झाडे असून खोदकाम करताना या झाडांची मुळेही सैल करण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस व वादळात कुठल्याही क्षणी पडून या झाडांचा बळी जाण्याची भीती स्थानिक वृद्ध महिला मृदुला गोखले, ज्येष्ठ नागरिक उल्हास दाते यांनी व्यक्त केली. काही वाढलेली झाडे पाडण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. जवळपास दहावर झाडांच्या मुळावरच प्रहार करण्यात आला आहे. जेसीबीने खोदकाम करताना झाडांच्या बाजूची संपूर्ण माती काढून त्यांचा आधारच नष्ट करण्यात आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे काही झाडांच्या फांद्याही तोडण्यात आल्या असून याबाबत कंत्राटदार कंपनीने महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचेही स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून पुढे आली. त्यामुळे महापालिकेतील अधिकारीही शहराची हिरवळ नष्ट करण्यास हातभार लावत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com