झन्ना- मन्ना जुगारावर अड्ड्यावर पोलिसांचा छापा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

नांदेड : झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नऊ जुगाऱ्यांना अटक केली. डावावरून सहा हजार व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी लोहा शहरात शनिवारी (ता.9) केली. 

लोहा शहरात शिवाजी चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक पोलिस पथकांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी धनंजय व्यंकट शिंदे, नामदेव गोविंद शिंदे, सिध्दार्थ बापूराव सोनकांबळे, सुनील व्यंकटराव वाघमारे, साहेबराव गणपतराव पवार, शिवाजी किशन जाधव, जयपाल पांडूरंग महाबळे, पवन बळीराम पवार आणि विनायक गोपालराव मोकले सर्व रा. लोहा यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख सहा हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. स्थागुशाचे पोलिस हवालदार दशरथ जांभळीकर यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलिस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख हे तपास करती आहेत. 

Web Title: Jhanna-Manna Gambling spot police raid and arrest