प्रेमाच्या त्रिकोणातून जिम ट्रेनरची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नागपूर - प्रेमप्रकरणातून एका व्यायाम प्रशिक्षकाने आपल्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मार्टीननगर, ख्रिश्‍चन कॉलनी येथे मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. जेम्स राधेश्‍याम जरवार (31, रा. मार्टीननगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याला आई आणि एक विवाहित बहीण आहे. 

तो मागील तीन वर्षांपासून मानकापूर परिसरातील गोंडवाणा छावणी, जेपी बिल्डिंगमध्ये असलेल्या तळेकर व्यायामशाळेत प्रशिक्षक होता. येथे तो पोलिस दलासह सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांना व्यायामाचे धडे द्यायचा. मृत जेम्सची आई एलिजा जरवार यांनी सांगितले की, जेम्सचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून दोघांत खटके उडू लागले. दरम्यान, तिच्या पहिल्या प्रियकराने त्याला जिममध्ये येऊन दम दिला. एवढेच नव्हे तर त्याला मारहाणही केल्याचा एलिजा यांचा आरोप आहे. सायंकाळच्या सुमारास आई घराबाहेर पडत नाही तोच जेम्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूची वार्ता कानावर येताच आईने पळतच घर गाठले. मात्र त्यापूर्वी जेम्सच्या पलंगावर असलेला मोबाईल प्रेयसीच्या आईने गर्दीचा फायदा घेऊन पळवून नेल्याचा आरोप आई एलिजा यांनी केला. कारण त्यात प्रेयसी युवतीचे संभाषण रेकॉर्ड होते. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद केली. ती युवती, तिची आई आणि प्रियकर पोलिस दलात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Jim Trainer Suicide