मुकुटबन : येथील साई कृपा जिनिंगमध्ये आगीने धारण केलेले रौद्ररूप.
मुकुटबन : येथील साई कृपा जिनिंगमध्ये आगीने धारण केलेले रौद्ररूप.

मुकुटबन येथे जिनिंगला आग

जामणी (जि. यवतमाळ) : मुकुटबनला लागून असलेल्या मुकुटबन-अदिलाबाद मार्गावरील ओम साई कृपा जिनिंग ऍण्ड प्रेसिंगला विद्युत शॉर्टसर्किटने आग लागली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी (ता. 19) सायंकाळी अचानक आग लागली. काही वेळातच कापसाच्या आगीने उग्ररूप धारण केले. अग्निशमनला पाचारण करण्यात आले होते. ओम साई कृपा जिनिंग ऍण्ड प्रेसिंगने हे जिनिंग भाडे तत्त्वावर संचालक हरमन कोटेक्‍स ऍण्ड सीड्‌स प्रा. लि. इंदूर (मध्य प्रदेश) यांना दिले होते. आग लागण्याची माहिती मिळताच कंपनीचे चालक घटनास्थळी पोहोचले. ठाणेदार धनंजय जगदाळे, पीएसआय नितीन चुलपार, दिगांबर उपरे, नीरज पातूरकर, सुलभ उईके, शशिकांत नागरगोजे, रमेश ताजने, मोहन उपरे व ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. वाहनांच्या मदतीने उर्वरित कापसाच्या रुईच्या गाठी स्थलांतरित करण्यात येत होत्या. वृत्त लिहीपर्यंत आग आटोक्‍यात आली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com