मूकनायक पत्रकारीता पुरस्कार आता दिल्लीत

delhi
delhi

खामगाव : वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी  धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार 31 जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी  दिली. 

खामगाव येथे फेब्रुवारी 2018 मध्ये राज्यस्तरीय मूकनायक पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. या सोहळ्याला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांना खामगावसह बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने आयोजकांनी मूकनायक पुरस्कार राज्य सरकारने सुरू करावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याच कार्यक्रमात राजकुमार बडोले यांनी सरकारच्या वतीने हा पुरस्कार एक लाख रुपयांचा देवू अशी घोषणा केली होती.
अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती, ओबीसी, महिला, कामागर, अशा वंचित शोषित घटकांच्या न्याय हक्कासाठी निर्भीड लेखन करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासेहब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या निर्भीड बाण्याचा वारसा जपणाऱ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रत्येकी एका पत्रकारास 1 लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक तर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रत्येकी एका पत्रकारास 25 हजार रूपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक असे राज्यस्तरावर एकूण 4 पुरस्कार देण्यात येतील असे बडोले यांनी सजाहीर केले आहे. त्याबद्दल मूकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार समितीच्या सर्व टीमने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व सरकारचे आभार मानले आहेत.

खामगाव येथून बुलडाणा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने सा पुरस्काराची आम्ही सुरुवात केली. हा पुरस्कार सरकारने सुरू करावा अशी आमची मागणी त्यावेळी केली होती. ती आज मान्य झाली असून सरकारने यावर्षीपासून मूकनायक दिल्ली येथून सुरू केला, ही बाब बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी गौरवास्पद आहे.
- राहुल पहुरकर, अध्यक्षत 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार समिती बुलडाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com