बुथची माहिती द्या - नड्डा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

बुथ मजबूत झाल्यास पक्ष मजबूत होईल. पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याकडे लक्ष द्यावे. बुथवरील प्रत्येकाला सरकारने केलेल्या कामांची माहिती द्या. त्यांचे मत परिवर्तन करा. कोण काय करतो आहे, याची ‘कुंडली’ पक्षाकडे आहे. त्यामुळे जेव्हाही मला भेटायचे असेल तेव्हा तुमचा बायोटाडा घेऊन न येता, सोबत आपल्या बुथची संपूर्ण माहिती घेऊन या, अशा कडक शब्दांत भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या आहेत.

नागपूर - बुथ मजबूत झाल्यास पक्ष मजबूत होईल. पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याकडे लक्ष द्यावे. बुथवरील प्रत्येकाला सरकारने केलेल्या कामांची माहिती द्या. त्यांचे मत परिवर्तन करा. कोण काय करतो आहे, याची ‘कुंडली’ पक्षाकडे आहे. त्यामुळे जेव्हाही मला भेटायचे असेल तेव्हा तुमचा बायोटाडा घेऊन न येता, सोबत आपल्या बुथची संपूर्ण माहिती घेऊन या, अशा कडक शब्दांत भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या आहेत. 

कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहात आयोजित विजय संकल्प सभेत आज ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय संघटन सहसचिव व्ही. सतीश, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार आदी या वेळी उपस्थित होते. नड्डा म्हणाले, भाजप देशातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. आज याची सदस्य संख्या १८ कोटींवर गेली आहे. सक्षम नेतृत्व आणि सरकार या देशाला पहिल्यांदा मिळाले आहे. पक्षात प्रत्येक आमदार, खासदाराचे आणि संघटनेतल्या कार्यकर्त्यांचे ऑडिट होते. त्यामुळेच त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल निघत असतो. तेव्हा प्रत्येकाची ‘कुंडली’ पक्षाजवळ आहे. या पक्षाचे कार्यकर्ते झालात हे तुमचे भाग्य आहे, त्यामुळे पक्षाकडून घेण्यापेक्षा मी पक्षाला काय दिले, याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JP Nadda Talking Politics