शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यास न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्‍यातील दाताळा येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला आज ता.27 जून रोजी खामगाव येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने हिवसे याला 10 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 

खामगाव - पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्‍यातील दाताळा येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला आज ता.27 जून रोजी खामगाव येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने हिवसे याला 10 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मलकापूर तालुक्‍यातील उमाळी गावातील शेतकरी त्यांच्या पत्नीसोबत पीक कर्जासाठी गुरूवार ता.21 जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला होता. कागदपत्रांची तपासणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना शेतकऱ्याला बॅंक व्यवस्थापकाने केली होती. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्‍लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी शेतकऱ्याने मलकापूर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सेंट्रल बॅंकेचा शाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र घटने झाल्यानंतर दोघे आरोपी फरार झाले होते. दरम्यान पोलिसांनी शिपायास अटक केली. तर सोमवारी रात्री पोलिसांनी राजेश हिवसे याला नागपूरातून अटक करून मंगळवारी खामगाव येथील न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने हिवसे यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. तर आज बुधवार ता.27 जून रोजी पोलिस कोठडी संपल्याने आरोपी हिवसे यास खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राजेश हिवसे याला 10 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Judicial custody of a bank officer