न्या. लोया मृत्यूप्रकरणाची होणार सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर - न्या. लोया रविभवनात थांबले होते तेव्हा, त्यांच्यासोबत न्या. विनय जोशीदेखील होते, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे न्या. रवी देशपांडे व न्या. विनय जोशी यांचे खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण  झाला होता. परंतु, न्या. विनय जोशी यांनी आज (गुरुवार) या प्रकरणावर सुनावणी  करण्यास हिरवी झेंडी दाखविली.

ॲड. अभियान बारहाते यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली. रविभवनमध्ये १ डिसेंबर २०१४ रोजी न्या. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी करावी, अशी विनंती करणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. सूर्यकांत लोलगे आणि योगेश नागपुरे यांनी या याचिका दाखल केल्या होत्या. यादरम्यान अशाच विनंती करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्यात आल्या होत्या. न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अन्य याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी झाली. परंतु, या विनंतीमध्ये काहीच तथ्य नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने या याचिका खारीज केल्या होत्या. 

यापूर्वी सूर्यकांत लोलगे यांची याचिकाही वर्ग करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका नागपूर खंडपीठात परत पाठवली. नागपुरे यांची याचिका मात्र वर्ग करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागपूर खंडपीठातच दोन्ही याचिका प्रलंबित होत्या. लोलगे आणि नागपुरे या दोघांनीही  या याचिका मागे घेतल्या. याचिका मागे घेत असताना याचिकाकर्त्यांनी माहिती लपवून ठेवली. तसेच नागपूर खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली. २३ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Web Title: Justice Loya case hearing