ज्योत्स्ना बंग "तीज क्‍वीन'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

हिंगणा (जि.नागपूर):  तालुका माहेश्‍वरी महिला मंडळातर्फे श्रावण तीजशृंगार उत्सव स्व. देवकीबाई बंग शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. यावेळी महेश वंदना, आकर्षक राजस्थानी नृत्य, वन मिनिट शो, तीज क्वीन, झुला डेकोरेशन आदी रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले.

हिंगणा (जि.नागपूर):  तालुका माहेश्‍वरी महिला मंडळातर्फे श्रावण तीजशृंगार उत्सव स्व. देवकीबाई बंग शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. यावेळी महेश वंदना, आकर्षक राजस्थानी नृत्य, वन मिनिट शो, तीज क्वीन, झुला डेकोरेशन आदी रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले.
यानिमित्ताने विविधतेने नटलेल्या व शृंगारात नेहमीच वर्चस्व असलेल्या राजस्थानी संस्कृतीचे दर्शन या उत्सवातून घडले. यात दोनशे महिलांनी सहभाग घेतला. पाहुणे म्हणून जिल्हा माहेश्‍वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष सुषमा बंग, जिल्हा मंडळाच्या आशा दुजारी, हिंगणा तालुका माहेश्‍वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष किरण बंग, उपाध्यक्ष अनिता सारडा प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी वंश मिनीयार यांनी पर्यावरण रक्षणावर मनोगत व्यक्त केले. प्रियांका बंग, प्रीती बंग, विशाखा बंग, राशी बंग यांनी आकर्षक नृत्य सादर केले. हिंगणा तालुका माहेश्‍वरी "तीज क्वीन' म्हणून ज्योत्स्ना बंग यांची निवड झाली; तर द्वितीयस्थानी नीता बंग तर तृतीय स्थानी श्‍वेता मिनीयार जाहीर करण्यात आले. आयोजन हिरू बंग, अमृता बंग, श्रद्धा बंग, श्‍वेता मिनीयार यांनी केले. संचालन अरुणा बंग यांनी केले. आभार प्रीती बंग यांनी मानले. कार्यक्रमाला सरला बंग, रंजना बंग, सोनल मिनीयार, ममता बंग, सुमन असावा, दीप्ती मिनीयार, पायल बंग, माया मिनीयार, नीता बंग, सीमा मिनीयार, यशोदा दरक, रोहिनी बंग, राजश्री बंग, संगीता नावंदर, नेत्रा जयस्वाल, पूनम व्यास आदींसह समाजातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyotsna Bang "Tees Queen"