कढोली गावाचा दिल्लीत सन्मान, मिळाला पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

कामठी, (जि. नागपूर) : तालुक्‍यातील कढोली ग्रापंचायतीला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. कढोलीच्या सरपंच प्रांजल राजेश वाघ व सचिव ब्रह्मानंद खडसे, राजेश वाघ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

कामठी, (जि. नागपूर) : तालुक्‍यातील कढोली ग्रापंचायतीला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. कढोलीच्या सरपंच प्रांजल राजेश वाघ व सचिव ब्रह्मानंद खडसे, राजेश वाघ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 
23 ऑक्‍टोबर रोजी दिल्ली येथील सुब्रह्मण्यम सभागृहात केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन कढोलीच्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात बावीस राज्यांतील पुरस्कार्थी आले होते. त्यात महाराष्ट्रातील 17 गावांची निवड करण्यात आली होती. 
पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये व प्रशस्तीपत्र असे असून या स्पर्धेत पाच प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा असून ई-पंचायत पुरस्कार, पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार आणि बालहितैषी पुरस्कार असे स्वरूप असून कढोली गावाने या पुरस्कारासाठी सहभाग नोंदविल्यानंतर तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व केंद्रीय स्तर या चाचणी परीक्षेतून जाऊन अंतिम निवड केंद्रीय चमूने केली. पुरस्कार कढोली गावाला स्वच्छता, प्राकृतिक संसाधन प्रदर्शन, सामाजिक क्षेत्र प्रदर्शन, ई-गव्हर्नन्स, राजस्व सृजन नावाचार, नागरिक सेवा, दुर्बल वर्ग सेवा, प्यायचे पाणी, पथदिवे आदी थीमवर देण्यात आला. 
पुरस्कारासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कामठी पं.स.चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, प्रशांत चवरे, एस. डी. पटले, सरपंच संघटनेचे मनीष फुके यांचे मार्गदर्शन लाभले. गावकऱ्यांच्या वतीने गुलालाची उधळण करून जल्लोषाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रांजल राजेश वाघ यांनी समस्त गावकऱ्यांचे प्रशासनिक अधिकाऱ्यांचे आभार मानले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadholi village honors in Delhi