कळंब : ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

कळंब (जि. यवतमाळ) : पंचायत समितीसमोरील महामार्गावर अपघातग्रस्त ट्रक.
कळंब (जि. यवतमाळ) : पंचायत समितीसमोरील महामार्गावर अपघातग्रस्त ट्रक.

कळंब (जि. यवतमाळ) : नादुरुस्त ट्रक दुरुस्त करीत असताना यवतमाळकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. यात ट्रकची दुरुस्ती करीत असलेला चालक व इतर दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज, बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास कळंब येथील पंचायत समितीसमोर घडली.

ट्रकचालक संतोष पुरुषोत्तम येरके (वय 40, रा. मोहा), मनोज काकपुरे (वय 40, रा. मोहा), लखन बघेल (वय 55, रा. घाट, जि. बैतुल) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ट्रकला धडक देणाऱ्या ट्रकचा चालक व अन्य एक असे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठले. भरधाव ट्रकने चिरडल्याने तिघांच्याही शरीराचा चेंदामेंदा झाला होता. हे चित्र बघून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. ट्रकचालकाला डुलकी आल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कळंब पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. गंभीर अपघात घडला असताना रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर काहींनी संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com