घुमशान! कामठी सर्वांत मोठा मतदारसंघ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रशासनानेही कंबर कसली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्‍यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदार वाढविण्याचाही प्रयत्नही होत आहे. जिल्ह्याची मतदारसंख्या 41 लाखांवर आहे. कामठी विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या सर्वांत जास्त असून, सर्वांत कमी मतदार असलेले विधानसभाक्षेत्र काटोल आहे.

लोकसभेनंतर विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. या आठवड्यात आचारसंहिता लागणार असून, ऑक्‍टोबर महिन्यात मतदान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मनुष्यबळ पुरविण्यासाठी सर्व विभागांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. कर्मचारी न देणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्यासोबत वेतन रोखण्याचा इशाराही जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळे विधानसभेत ती वाढविण्याचा प्रशासनाचा जोर आहे. नवीन मतदारांची नावे जोडण्यासोबत मृत पावलेल्या मतदारांची नावे वगळण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात आले. नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष अभियानही राबविण्यात आले. याचा चांगला परिणाम समोर आला आहे. जिल्ह्याची मतदार संख्या आजच्या घडीला 41 लाख 63 हजार 367 आहे. यात पुरुष मतदार 21 लाख 31 हजार 149 तर महिला मतदारांची संख्या 20 लाख 32 हजार 118 आहे. शंभर मतदार तृतीयपंथी आहेत. यात वाढ होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamthi largest constituency