कामठीतून टेकचंद सावरकर यांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून भाजपने त्यांना जोरदार धक्का दिला आहे. त्यांच्याऐवजी कामठी मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे भाजप समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. भाजपच्या पहिल्या दोनही यादीत बावनकुळे यांचे नाव नव्हते. त्यांनी काटोल लढावे असेही तोंडी सांगण्यात येत होते. मात्र, गुरुवारी रात्री जाहीर केलेल्या यादीतही त्यांचे नाव नसल्याने शंकेची पाल चुकचुकायला लागली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamthi, tekchand savarkar