कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नागपूर - बहुजन विचारमंचतर्फे रविवारी (ता.23) आयोजित केलेल्या संविधान जागरच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार व प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज नागपुरात येणार आहेत.

बहुजन विचारमंचतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात असला तरी या आयोजनामागे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात संविधानावर तसेच संविधानानुसार अस्तित्वात असलेल्या संस्थांना खिळखिळे करणे सुरू आहे. याचा विरोध करण्यासाठी संविधान जागर होणार आहे. या कार्यक्रमाला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्याकडे दिले आहे. स्थानिक किंवा राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना या कार्यक्रमात मात्र सामील करून घेतलेले नाही, हे विशेष.

Web Title: Kanhaiyakumar Prakash Raj in Nagpur