कपिल शर्माच्या शोमध्ये कधीच जाणार नाही - कॉमेडियन कृष्णा अभिषेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नागपूर - कपिल शर्मा माझा चांगला मित्र आहे. परंतु, त्याच्या शोमध्ये कधीही जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. दोन मिनिटांचा सीन करण्यात काहीच रस नाही. माझे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते टिकवून ठेवायचे आहे, अशी रोखठोख भूमिका सुप्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने मंगळवारी नागपुरात स्पष्ट केली. नवीन रिॲलिटी शोच्या प्रमोशनसाठी नागपुरात आला असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला.

कपिल शर्मा, कृष्णा, सुदेश व भारती या चार कलावंतांनी विनोदाची संकल्पना बदलली आणि भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. परंतु, यांच्यातून कपिल वेगळा झाला आणि सगळेच गणित बदलले. कपिलने स्वतःच्या नावाने शो सुरू केल्यामुळे प्रेक्षक त्याच्याकडे वळले आणि इतर कॉमेडी शोंना घरघर लागली. ही ताटातूट आणि वाद कुणापासूनही लपलेला नाही.

यावर बोलताना कृष्णा म्हणतो, कपिलचा शो खूप आवडतो. त्याच्यामुळे मनोरंजनाच्या उद्योगाला मोठी उभारी मिळाली. त्याने मला शोमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण, तो कपिलच्या नावाचा शो आहे. तिथे माझ्यासाठी स्पेस नाही. वादावर भाष्य करताना तो म्हणतो, चार मित्रांमध्ये भांडण होणे आश्‍चर्याचे नाही. परंतु, चर्चा खूप झाल्यामुळे कपिल आणि सुनील ग्रोवरचा विषय वाढत गेला. दुसऱ्या एखाद्या व्यासपीठावर कपिलसोबत शो करायची वेळ आली, तर नक्की करेन, असेही कृष्णा सांगतो.

‘सकाळ’ला सदिच्छा भेट
अभिनेता कृष्णा अभिषेकने ‘सकाळ’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. मराठी नटांबद्दल कमालीचा आदर असल्याचे सांगत ‘ब्लॅक’मधील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेपेक्षा आपल्याला ‘नटसम्राट’मधील नाना पाटेकर अधिक आवडल्याचे कृष्णा म्हणतो. ‘इतर कुठल्याही प्रादेशिक भाषांच्या तुलनेत मराठीतील नटांना अभिनयाच्या जोरावर अधिक मागणी आहे. काही वर्षांमधील मराठी सिनेमा बघूनच मीसुद्धा मराठी चित्रपट करतोय. ‘भिंगरी’ या चित्रपटात मी दिसणार आहे,’ असेही कृष्णाने सांगितले. अनिल कपूर रोल मॉडेल असल्याचे सांगत मामा गोविंदा कायम प्रेरणादायी ठरत आला, असेही तो म्हणतो. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी कृष्णाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

‘सकाळ’ कार्यालयातील संवाद बघण्यासाठी िक्लक करा https://www.facebook.com/Sakalvidarbha/videos_by

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapil Sharma will never be in the show