कीटकनाशक फवारणीची दोन शेतकऱ्यांना बाधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कारंजा, (जि. अकोला) - कारंजा तालुक्‍यातील कामरगाव येथून जवळच असलेल्या तथा मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्‍यातील मोटोडा येथील दोन जणांना कीटकनाशकांच्या फवारणीनंतर त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अमरावती येथील सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले. अरविंद किसन कांबळे व राजेश पांबराव ढोरे अशी त्यांची नावे आहेत. तुरीवर फवारणी केल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला होता.
Web Title: karanja news Inhibition of pesticide spraying of two farmers