कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी पिण्याचे पाणी दुषित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाव्दारे कटंगी मध्यम प्रकल्पातुन नळ योजनेमार्फत गोरेगाव, घोटी, भडंगा, मुंडीपार, कटंगी टोली (चंद्रपुरटोली) या ठिकाणी पाणी पुरवठा केल्या जात आहे. परंतु, कटंगी मध्यम प्रकल्पात पाणी साठा कमी आहे व याठिकाणी मासेमारी केली जात असल्याने पाण्याचा रंग पांढरा व फिकट हिरवा आहे त्यामुळे नळ योजनेचा पाणी पुरवठा हा गढुळ होत असल्याची माहीती  सकाळला देण्यात आली.

गोरेगाव - येथील महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाव्दारे कटंगी मध्यम प्रकल्पातुन नळ योजनेमार्फत गोरेगाव, घोटी, भडंगा, मुंडीपार, कटंगी टोली (चंद्रपुरटोली) या ठिकाणी पाणी पुरवठा केल्या जात आहे. परंतु, कटंगी मध्यम प्रकल्पात पाणी साठा कमी आहे व याठिकाणी मासेमारी केली जात असल्याने पाण्याचा रंग पांढरा व फिकट हिरवा आहे त्यामुळे नळ योजनेचा पाणी पुरवठा हा गढुळ होत असल्याची माहीती  सकाळला देण्यात आली.

कटंगी मध्यम प्रकल्पातुन पोलीस मुख्यालयाला सरळ पाईपलाइनव्दारे पाणी पुरवठा होत असुन त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण केल्या जाते. गोरेगाव, घोटी, भडंगा, मुंडीपार, कटंगी टोली या गावाकरीता प्रकल्पातील पाणी कालव्याव्दारे विहीरीत पाणी पुरवठा करुन वीज पंप पाईपव्दारे फिल्टर केंद्रात सोडण्यात येते पाणी पुरवठा गडुळ होत  असल्याने पाणी शुद्धीकरण्यासाठी ब्लेचींग, पी.ए.सी. पावडर टाकली जाते. या शुद्धीकेंद्रात पुर्णता पाणी शुद्धीकरण होत नसल्याने या पाच गावातील नागरीकांना गढुळ पाणी पुरवठा होत असल्याची चर्चा आहे.

पाणी पुरवठा करणा-या विहीरीत पाणी साठा नियमित ठेवण्यासाठी कटंगी मध्यम प्रकल्पातुन कालव्याव्दारे पाणी पुरवठा केला जातो.  यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. याशिवाय नागरीकांना पिण्याचे शुद्धीकरण पाणी मिळणार नाही पाणी पुरवठा गढुळ न करता त्यात सुधारणा करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी गढुळ असुन मासेमारी केली जाते हे पाणी कालव्याव्दारे विहीरीत येत असल्याने पाणी पुरवठा गढुळ होत आहे असे महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाचे शाखाधिकारी रोशनी धमगाये यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Katangi water project of drinking water is polluted