काटोल : तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या काटोल मतदरसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांनी तिसऱ्याही फेरीत आघाडी घेतली आहे. सध्या त्यांनी 201 मतांची आघाडी आहे.

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या काटोल मतदरसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांनी तिसऱ्याही फेरीत आघाडी घेतली आहे. सध्या त्यांनी 201 मतांची आघाडी आहे.

सलग चारवेळा काटोल सर करणारे माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भाजपने या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली. काटोलमध्ये देशमुखांचा करिश्‍मा कायम असल्याची पावती देणारी ही निवडणूक ठरणार आहे. काटोलमधून दहा उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष चरण कमल ठाकूर यांचाही त्यात समावेश आहे. मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी देशमुखांनी पूर्ण तयारी केली. उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेले शक्तिप्रदर्शन व अर्ज भरण्याची चुकलेली वेळ यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. निवडणुकीपूर्वी खासदार अमोल कोल्हे व अमोल मिटकरी यांच्या दणक्‍यात सभा झाल्या. निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आल्याने देशमुख यांनी ही निवडणूक मनावर घेतल्याचे मानले जाते. वंचितचे दिनेश टुले दणक्‍यात प्रचार करीत राष्ट्रवादी, भाजपचे डोकेदुखी वाढविल्याचे सांगितले जात होते. परंतु निकालातून वंचितचा करिष्मा पडल्याचे दिसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: katol vidhan sabha election result anil deshmukh ahead