Maharashtra vidhansabha 2019 : सावनेरमधून केदारांचा अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

सावनेर (जि. नागपूर) : मोदी लाटेत जिल्ह्यात एकमेव कॉंग्रेसची जागा राखणारे सुनील केदार यांनी सावनेरमध्ये किंगसाईज शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सुमारे वीस हजारांहून अधिक समर्थकांनी सावनेरात हजेरी लावली होती. पत्नी अनुजा व मुलगी पौर्णिमा यांच्यासह किशोर गजभिये व मनोहर कुंभारे, सौंसरचे आमदार विजय चौरे यांच्यासह त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल महेत्रे यांना अर्ज सादर केला. 

त्यांच्या रॅलीत सावनेर व कळमेश्वर तालुक्‍यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, नगरपालिका सदस्यांसह हजारो कॉंग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगटांच्या सदस्य उपस्थित होते. श्रीक्षेत्र आदासा येथून श्रीगणेशाचे आशीर्वाद घेऊन त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या रॅलीला संबोधित केले. सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र परिवर्तनाची लाट आहे व सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kedar's application was filed from Sawner