खडसे यांना झोटिंग समितीचा झटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या डी. झोटिंग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अर्ज फेटाळून लावले. यामुळे चौकशीची प्रक्रिया लांबणीवर नेण्यासोबत सक्षम साक्ष, पुरावे सादर करण्याचा त्यांचा दुसरा प्रयत्नही फसला. यावर शनिवारी (ता. 29) अंतिम सुनावणी होणार असून, त्यानंतर समिती अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

महसूलमंत्री असताना खडसे यांनी पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा नातेवाइकांना कमी दरात दिल्याचा आरोप आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश डी. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. समितीने पुण्याचे जिल्हाधिकारी, महसूल व एमआयडीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदविली. त्याचप्रमाणे खडसे यांचीही साक्ष नोंदविली. 

त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना उलट तपासणीसाठी परत बोलाविण्याबरोबरच समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेतला होता. समितीने जिल्हाधिकाऱ्यांना बोलाविण्यास नकार दिला. दुसऱ्या अर्जावर अंतिम निर्णयाच्यावेळी निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. या आदेशावर आक्षेप घेत तो मागे घेण्याचा अर्ज खडसे यांनी नव्याने केला. यावर सुनावणी घेत हा आदेश मागे घेण्यास नकार देत तो फेटाळून लावला. 

उद्या अंतिम सुनावणी 
प्रत्येक्ष कागदपत्रांद्वारे मिळालेली माहिती, स्पष्टीकरण आणि समितीसमोर दिलेली साक्ष यांत अंतर आहे. समितीसमक्षही साक्ष वेळोवेळी बदलल्याचे समितीने आदेशात नमूद केल्याची माहिती आहे. काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा खडसे यांना दिली. शनिवारी, (ता. 29) अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती एमआयडीसीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील चंद्रशेखर जलतारे यांनी दिली. 

Web Title: Khadse Jhatting Committee shock