खामगाव रेल्वे स्टेशन नावाला, गाडी नाही एकाही गावाला !

khamgaon
khamgaon

खामगाव : खामगाव शहर हे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले शहर आहे. त्याच प्रमाणे मोठ मोठे उद्योग या ठिकाणी असल्यामुळे  देशातील मोठा व्यापारी वर्ग सुध्दा शहराशी जुळलेला आहे आणि व्यापार म्हटला की, रेल्वे वाहतुक ही आलीच त्या दृष्टीने जुन्या काळात मुख्य रेल्वे लाईनला जोडण्यासाठी खामगाव-जलंब ही मिटरगेज रेल्वे लाईन टाकण्यात आली. ती रेल्वे लाईन आजपर्यंत तशीच आहे. खामगाव-जलंब जाण्यासाठी दिवसातून तीन फेऱ्या सुरु असून त्या व्यतिरिक्त ना अजून कोणत्या गावाला रेल्वे जाते, ना स्टेशनवर कोणत्या  सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे खामगाव स्टेशन हे फक्त नावालाच असल्याचे दिसून येते. 

रेल्वे क्षेत्राचे जाळे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्यांचे जाळे असे आपल्या देशात रेल्वे संबंधिची संकल्पना आहे आणि ते बहुतांशी खरेही आहे. जे शहर रेल्वे मागार्शी जुळलेले आहे त्या शहराची आर्थिक भरभराट झाल्याचे आपल्याच आजु-बाजुच्या शहरांवरुन दिसून येते.

याउलट खामगाव शहरामध्ये रेल्वे स्थानक असून सुध्दा त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होतांना दिसून येत नाही. जुन्या काळी विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ असल्या कारणाने व्यापाराच्या दृष्टीने खामगाव-जलंब मिटर गेज रेल्वे लाईन टाकण्यात आली. पुढे त्याच लाईनवर प्रवासी वाहतुकीसाठी दोन डब्ब्यांची रेल्वे बस सुध्दा सुरु करण्यात आली परंतु तेव्हापासून या परिस्थितीत कोणताच बदल नाही. ना नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आला, ना रेल्वे स्टेशनवर ज्या मुलभुत सुविधा हव्या त्या उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना शेगाव,नांदुरा, मलकापूर किंवा अकोला या मध्य रेल्वेशी जुळलेल्या स्टेशनवर जावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे जास्त पैसे तर खर्च होतातच सोबतच गाड्यांना विलंब होत असल्याने दुसऱ्या  शहरात जावून गाडीची वाट बघण्याचा मनस्ताप देखील सहन करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी अनेक वषार्पासून प्रलंबित असलेली  एख्याद्या मोठी शहराशी खामगाव रेल्वे लाईन जोडण्याची ही मागणी म्हणा किंवा नागरीकांच्या मनातील सुप्त ईच्छा पुर्ण होईल का हे जरी आता सांगणे कठीण असले तरी खामगावकर मात्र त्या दिवसाची वाट पाहत आहेत.

केवळ आषाढी वारीसाठीच जाते विशेष गाडी
राज्यात वर्षभरात अनेक असे सण, उत्सव, जत्रा या सारखे सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन वेगवेगळ्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलेले असते.  परंतु  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरलाच केवळ आषाढी वारी निमित्त विशेष गाडी सोडण्यात येते. या व्यतिरिक्त वषार्तुन कोणतचे वेगळे प्रयोजन रेल्वे विभागामार्फत केल्या जात नाही. त्यामुळे आणखीनही काही विशेष गाड्यांचे प्रयोजन रेल्वे विभागाने करावे अशी मागणी प्रवाशांकडून सतत होतांना दिसते.

अर्थसंकल्पावेळी केवळ चर्चेला उधाण
दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्याची वेळ आली की, सर्वत्र चर्चांना उधाण येते खामगावला या शहराशी जोडले जाईल, त्या शहराशी जाईल परंतु या सर्व फक्त चर्चाच राहतात. याच चर्चेच्या भाबळ्या आशेवर अर्थसंकल्प जाहीर होत असतांना आपल्या खामगाव शहरासाठी रेल्वे विभागामार्फत काही नवी घोषणा होते की काय यासाठी टिव्ही कडे डोळे लावून बसलेल्या शहरवासियांच्या पदरी प्रत्येक वेळी केवळ निराशाच येते.

राजकीय अनास्थेमुळे खामगाव रेल्वेस्थानकाचा विकास झालेला नाही. खामगाव-जालना रेल्वे सुरु होण्याची शक्यता धुसर आहे. मात्र खामगाव येथून अमरावती, नागपूर व अन्य ठिकाणी जाणाºया पॅसेंजर व इंटरसिंटी रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रेल्वे सुरु झाल्यास शहराच्या विकासात आणखी भर पडेल.
- तेजेंद्रसिंह चौहान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवा दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com