खामगाव शहरात वृक्षाची अवैध कत्तल थांबविली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

खामगाव - एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोटयावधी रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे आर्थिक साटेलोटे साधण्यासाठी खामगाव नगर पालीकेच्या वतीने बेकायदेशीररित्या शहरातील वृक्षांची अवैध कत्तल करण्यात येत असल्याचा आरोप करत काॅंग्रेसचे  शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण कदम यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अवैध वृक्ष तोड प्रकरणाची सखोल चौकशी  करण्यात यावी व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी  मागणी  त्यांनी केली आहे. 

खामगांव शहरात जलंब व वाडी रस्त्याचे रुंदी करणाचे काम  कासव गतीने सुरु आहे. मागील वर्षभरापासून  या रस्त्याचे  काम सुरु असतांना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली काहीही कारण नसताना अरुणोदय नगर, अमृत नगर या भागातील रस्त्याच्या बाजूला अंदाजे पाच ते सात मिटर अंतरावर असलेली  कडुनिंबाच्या अनेक झाडांची खामगाव नगर पालीकेच्या वतीने कत्तल करण्यात येत आहे.याबाबत अमृत नगर भागातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पंकज गिरी व काॅंग्रेस शहर अध्यक्ष प्रविण कदम यांच्याकडे माहिती दिली असता प्रविण कदम यांनी घटनास्थळी जाउन झाडे कापणा-या मजुरांना अडवुन सदर वृक्ष तोड थांबविली. रस्ता बनवित असतांना या वृक्ष तोडीची कोणतीही गरज नव्हती. परंतू खामगांव नगर पालीकेने  नियमबाहय पध्दतीने हया वृक्षांची हर्रासी केली व आर्थिक साटेलोटे साधण्यासाठी हिरव्यागार वृक्षाचा नाहक बळी दिला जातत आहे.वृक्षतोड केल्यानंतर कंत्राटदाराने वाहनाद्वारे लाकडे सुध्दा वाहुन नेली. हा प्रकार पाहुन नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.खामगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी हिरव्यागार वृक्षाची अवैध कत्तल सुरु असुन नगर पालीका तसेच संबंधित विभागाचे वरिश्ठ अधिकारी आर्थिक देवाण घेवाणीसाठी याबाबीकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत आहे असा आरोप प्रवीण कदम यांनी केला आहे.

Web Title: khamgaon vidarbha news Khamgaon stopped the illegal slaughter of the tree in the city