खामगाव: मॉन्सून लांबल्याने नागरिकांच्या डोळ्यांत पाणी

श्रीधर ढगे
गुरुवार, 14 जून 2018

खामगाव: आधीच पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या नागरीकांच्या डोळ्यांत मान्सून लांबल्याने पाणी आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू असून, टँकरवर पाणी भरताना मोठी गर्दी उसळत असल्याने अपघात सुद्धा घडत आहेत.शेगाव तालुक्यातील चिंचोली या 5 हजार लोकवस्ती असलेल्या गावात सुद्धा अशीच भीषण परिस्थिती आहे.

चिंचोली गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई असली तरी प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यावर्षीही गावात दोन टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावात टँकर आले की लोक प्रचंड धांदल उडते, जिवाची पर्वा न करता लोक पाण्यासाठी टँकरवर तुटून पडतात. मात्र तरी सुद्धा पाणी मिळविण्यासाठी झुंबड सुरू असते. दरम्यान, मॉन्सून लांबला असल्याने पाणी टंचाईची दाहकता आणखीच वाढली आहे.

आमच्या गावात भीषण पाणी टंचाई आहे. प्रशासनाने दोन टँकर सुरू केले आहेत. मात्र त्यात भागत नाही. पाण्यासाठी तंटे, अपघात होत आहेत. गावात पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.
- नर्मदा तराळे, महिला चिंचोली

आमच्या गावाची लोकसंख्या पाच हजारावर असून पाणी टंचाई असल्याने काम धंदे शोधुन टँकरची वाट पहावी लागते. प्रशासनाने गावात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- देवांनंद गवई, ग्रामस्थ चिंचोली

पाण्यासाठी टँकरवर मोठी गर्दी होते. पाणी भरण्यासाठी टँकरवर आलेल्या एका तरुणाचा हात मोडला, महिलेचे डोके फुटले. पाणी टंचाई मुळे आमचे हाल सुरू असून त्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.
- प्रल्हाद काळे, युवक चिंचोली

Web Title: Khamgaon: Water in the eyes of the people by delaying the monsoon