सर्पतज्ञ्ज्ञ राजेश ठोंबरे यांना खान्देशभुषण पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

संपुर्ण राज्यात सर्पतज्ञ्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेले राजेश ठोंबरे यांचा मुंबईतील खान्देश मराठा मंडळातर्फे यंदाचा खान्देशभुषण पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात खान्देशातुन सर्पतज्ञ्ज्ञ तथा मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांचा एकट्याचा समावेश आहे.

चाळीसगाव: संपुर्ण राज्यात सर्पतज्ञ्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेले राजेश ठोंबरे यांचा मुंबईतील खान्देश मराठा मंडळातर्फे यंदाचा खान्देशभुषण पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात खान्देशातुन सर्पतज्ञ्ज्ञ तथा मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांचा एकट्याचा समावेश आहे.

6 जानेवारीला बदलापुर (जि.कल्याण) येथील गायत्री गार्डनमध्ये होणार्‍या खान्देश मराठा पाटील मंडळाच्या 15 व्या वार्षिक स्नेहसंमेलनातील विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबईच्या खान्देश मराठा पाटील मंडळाचे संस्थापक बाळासाहेब मोहने, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, बालाजी किणीकर, सीमा हिरे, माजी आमदार शरद पाटील, कुलबा- बदलापुरच्या नगराध्यक्षा विजया राऊत, उपनगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, मंडळाचे सचिव विश्वनाथ पाटील, कार्याध्यक्ष अशोक पाटील, प्रदीप पवार, शिवाजी पाटील, आदी उपस्थित राहणार आहेत. खान्देशातुन एकमेव राजेश ठोंबरे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Khandeshushushan Award for Rajesh Thombare