खरीप पिकाची सुधारीत पैसेवारी जाहीर 

Agriculture Department
Agriculture Department

अकाेल : खरीप पिकांच्या संदर्भात जिल्ह्यातील १०१२ गवांपैकी ९९१ गंवांची सुधारीत पैसेवारी काढण्यात अाली अाहे. यापैकी मूर्तिजापूर तालुक्यातील १६४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याची गंभीर परिस्थिती समाेर अाली असून, उर्वरीत तालुक्यातील ८२७ गावांची पैसेवारी ५० पैसेवारी पेक्षा जास्त अाहे. 

सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांकडून प्राप्त खरीप पिकांसंदर्भात सुधारीत अहवालानुसार ही सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. अकाेला तालुक्यात १९९ महसुली गावांपैकी १८२ गाव ही लागवडी याेग्य अाहेत. या सर्वच गवात खरीप पिकांची अाणेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त अाहे. सुधारीत पैसेवारी सरासरी ६२ अाहे. अकाेट तालुक्यात तालुक्यात १८५ महसुली गावांपैकी सर्वच गावे ही लागवडी याेग्य असून सर्वच गावात ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी अाहे. सुधारीत पैसेवारी ही ६८ अाहे. तेल्हारा तालुक्यात १०६ गावांपैकी सर्वच गावात ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असून सुधारीत पैसेवारी ही ६४ इतकी अाहे. 

बाळापूर तालुक्यात १०३ गावात ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असून सुधारीत पैसेवारी ही ५६ अाहे. पातूर तालुक्यात ९५ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असून सुधारीत पैसेवारी ही ६२ अाहे. तालुक्यात महालडाेली हे वनग्राम असल्याने ते खरीप पिक लागवडीखाली येत नाही.बार्शिटाखळी तालुक्यात १६० गावांपैकी १५७ गावे ही लागवडी याेग्य अाहेत. ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असणाऱ्या गावांची संख्या १५७ असून सुधारीत पैसेवारी ही ५७ अाहे. वार्शीटाकळी तालुक्यात यावलखेड हे वनग्राम अाहे. सातळी हे गाव पाण्यातखाली असून अटकळी हे गाव दगडपारवा धरणाखाली अाहे.मूर्तिजापूर तालुक्यात १६४ पैकी सर्वच गावे ही ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीची अाहेत. सुदारीक पैसेवारी ही ४९ इतकी अाहे. 

पिकनिहाय पैसेवारी 
तालुका ज्वारी पैसेवारी कापूस पैसेवारी साेयाबीन पैसेवारी 
अकाेला ० ० २८०९३ ५९ ३५९११ ६५ 
अकाेट २७१३ ६८ ३२६३४ ६८ १३१५५ ६८ 
तेल्हारा २६४७ ६८ २३०९७ ६४ १५१२७ ६५ 
बाळापूर २०६४ ५६ २३८२० ५५ १९०१७ ५६ 
पातूर ० ० ७६०२ ६३ २९४३० ६२ 
मूर्तिजापूर ० ० ११९९२ ५४ ४१६८९ ४३ 
बार्शीटाकळी ० ० ९९३८ ६० ३४९७७ ५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com