गडकरींच्या 'बॉलिंग'वर सचिनची तुफान फटकेबाजी

Sachin-and-Nitin
Sachin-and-Nitin

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शालेय व महाविद्यालयीन जीवनात खूप क्रिकेट खेळले. त्यांची क्रिकेटर बनण्याची इच्छाही होती. परंतु, खेळाडूऐवजी ते राजकारणात आले. मात्र, त्यांच्यातील खेळाडू अजूनही जिवंत आहे. याचा प्रत्यक्षात अनुभव आज खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी यशवंत स्टेडियमवर उपस्थित नागपूरकरांना आला. उद्‌घाटन समारंभाच्या शेवटी गडकरी आणि सचिन यांच्यातील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगला. स्वत: गडकरी यांनी सचिनला ‘बॉलिंग’ टाकली अन्‌ सचिनने त्यांचे प्रत्येक चेंडू तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांमध्ये भिरकावून आपल्या मनगटात अजूनही तितकीच ताकद असल्याचे दाखवून दिले. सचिनने मारलेल्या प्रत्येक फटक्‍यावर प्रेक्षकांनी तेवढीच उत्स्फूर्त दाद दिली. सचिनने टोलवलेले चेंडू अनेकांनी ‘कॅच’ करून सचिनची आठवण म्हणून आपल्याकडे ठेवून घेतले.

दोघांमध्ये रंगलेल्या या पाच मिनिटांच्या सामन्याचा स्टेडियमवर उपस्थित हजारो नागपूरकर क्रीडाप्रेमींनी आनंद लुटला. सचिनसारख्या महान फलंदाजाला चेंडू टाकताना गडकरींनाही एका क्षणासाठी गोलंदाज असल्याचा भास झाला असावा. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वकाही सांगत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com